विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू
पुणे : पुढारी वृत्तसेवा : केबल टाकण्याचे काम करत असताना हाय टेन्शन विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला. कुंडलिक लक्ष्मण शिंदे , स्वप्निल शिवराम बोडके (रा. दोघेही सुतारदरा, कोथरूड) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी एन. पी. केबल नेटवर्कचा मालक नितीन पवार (रा. पौड फाटा, कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लक्ष्मण … The post विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : केबल टाकण्याचे काम करत असताना हाय टेन्शन विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला. कुंडलिक लक्ष्मण शिंदे , स्वप्निल शिवराम बोडके (रा. दोघेही सुतारदरा, कोथरूड) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी एन. पी. केबल नेटवर्कचा मालक नितीन पवार (रा. पौड फाटा, कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लक्ष्मण शिंदे (रा. सुतारदरा, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 4 मे रोजी दुपारी बारा ते सव्वाबाराच्या सुमारास अथर्व शाळेजवळ सुतारदरा कोथरूड येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन. पी. केबल नावाने आरोपी नितीन पवार याचा केबलचा व्यवसाय आहे. कुंडलिक आणि स्वप्निल हे दोघे त्याच्याकडे केबल टाकण्याचे काम करत होते. 4 मे रोजी दोघे सुतारदरा कोथरूड परिसरात केबल टाकण्याचे काम करत होते. त्या वेळी केबलची वायर ही हाय टेन्शनच्या वायरला चिटकल्याने दोघांना तीव्र विजेचा धक्का बसला. त्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, कुंडलिकचा दुसर्या दिवशी, तर पंधरा दिवसांनंतर स्वप्निलचा मृत्यू झाला. याबाबत सुरुवातीला कोथरूड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चौकशीअंती कागदपत्राचे अवलोकन केले असता आरोपी पवार हा विनापरवाना केबल व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक किसन राठोड यांनी सांगितले.
What's Your Reaction?