वैद्यकीय महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक चा वर्धापन दिन रोप्य महोत्सवी वर्ष म्हणून येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल यांच्या हस्ते करून साजरा करण्यात आला.
दि.१० जून विद्यापीठाचा २५ वा वर्धापन दिन रोप्य महोत्सवी वर्ष सामूहिक विद्यापीठ गीत गायन करून महाविद्यालयात सिल्वर जुबली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले सिल्वर जुबली सप्ताह अंतर्गत महाविद्यालय परिसरामध्ये वड, पिंपळ कडुनिंब. यांसारखी बहुउपयोगी वृक्षांचे वृक्षारोपण तसेच औषधी वनस्पतींचे ही लागवड करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून श्रमदान ही केले या वेळी उपप्राचार्य तथा रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.गणेश पांगारकर, डाॅ.रावसाहेब हंगे डॉ.अंजली पवार,डॉ. विवेक दुसाने,डॉ.शेख नासेर, डॉ.अजय कुलकर्णी,डॉ. शेख अनिस, डॉ गणेश खेमाडे, श्री एकनाथ टेपाळे,श्री कल्याण पानसरे यांचे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
What's Your Reaction?