पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वसंत मोरेंचं नाव चर्चेत
भाजपचे नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मनसेचे वसंत मोरे नशीब आजमवू शकतात.
खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुण्याच्या लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कधीही पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या या जागेसाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यावरून या पक्षांमधील नेत्यांमधेच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आता या जागेसाठी मनसे देखील मैदान उतरणार असल्याचं दिसत आहे आणि मनसेकडून पुण्यातील आपला हुकमी एक्का फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळख असलेले वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याची मागणी महाराष्ट्र सैनिक करत आहेत.
What's Your Reaction?