बीड जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवावा! जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे

बीड, (प्रतिनिधी): मतदान करणे हा आपला हक्क आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.
आज रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 39 बीड मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध विभागांची बैठक आयोजित केली, यावेळी त्या संबोधित करीत होत्या. याबैठकीस जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. विक्रम सारूक उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आपापल्या स्तरावरून प्रत्येकांनी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी बीड लोकसभा मतदार संघात होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन करुन, स्वतः मतदान करणे आणि इतरांना मतदान करण्यासाठी जागरूक करणे हे आपले नैतिक कर्तव्य असून ते पार पाडावे असे, त्या यावेळी म्हणाल्या. यासह आपण सर्व शासनाचा भाग आहोत. निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेमध्ये विविध जबाबदारी आपण पार पाडत आहोत. त्यामुळे मतदानाचा प्रचार प्रसार करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी आग्रहपूर्वक सांगितले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
याप्रसंगी पोस्ट ऑफिस, राष्ट्रीय तसेच मान्यताप्राप्त बँक, राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ, एलआयसी यांनी त्यांच्या कार्यालयात बॅनर, सेल्फी पॉईंट, स्टॅम्प च्या माध्यमातून 39 बीड मतदारसंघात 13 मे रोजी होणाऱ्या निवडणुकी विषयक ग्राहकांमध्ये करीत असलेल्या प्रचार प्रसारबद्दलची माहिती संबधित कर्मचाऱ्यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृती मोहीम राबवित आहेत. याअंतर्गत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मतदारांना जागृत करण्याची शपथ, मतदान करण्याचे आग्रहाचे निमंत्रण, प्रभात फेरी, आई-वडिलांना पोस्टकार्डने पत्र लिहून मतदानासाठी प्रवृत्त करने. असे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी गजानन सोनवणे यांनी दिली.
यासह शासनाच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 'सेल्फी विथ सिग्नेचर' ही यशस्वी मोहीम राबवली गेली. आकाशवाणीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधीक्षक, स्वीप नोडल अधिकारी यांच्या मुलाखती येत्या काळात प्रसारित होणार आहेत, माहिती कार्यालयाच्यावतीने फेसबुक, एक्सच्या माध्यमातून मतदान जागृती केली जात असल्याची, माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांनी सांगितले.
यासह येत्या काही दिवसात जिल्ह्यात मतदानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी 'मेगा इव्हेंट्स' आयोजित केले या अंतर्गत सायक्लोथॉन, मानवी साखळी असे उपक्रम राबवण्यात येतील असल्याचे स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.सारूक यांनी सांगितले.
मतदार स्तनदामाता तसेच गरोदर महिलांसाठी असणार विशेष व्यवस्था
मतदानाच्या दिवशी बीड जिल्हयात स्तनदा माता तसेच गरोदर महिलांसाठी विशेष व्यवस्था केली जाईल. या अंतर्गत मतदानाच्या ठिकाणी तात्पुरती अंगणवाडया तयार करून लहान बालकांना खेळणी तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिले जातील. या ठिकाणी स्तनदा माता तसेच गरोदर महिला त्यांचा मतदानाचा क्रमांक येईपर्यंत येथे थांबू शकतील, अशी माहिती प्रकल्प संचालक श्रीमती पाटील यांनी दिली.
मतदार नागरिकांनी समाज माध्यमांद्वारे 13 मे चा प्रचार करावा
मतदान करणे हा नागरिकांचा हक्क आहे यासाठी मतदारांनी मतदारांमध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी विविध समाज माध्यमांचा वापर करावा. यामध्ये मोबाईलवर डी.पी., स्टेटस, रिल्स, फेसबुक, शॉर्ट, इंस्टाग्राम या आणि अन्य समाज माध्यमांचा उपयोग करून सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी मतदानाच्या हक्क बजावण्याचा प्रचार प्रसार करावा असे, आवाहन, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज केले.
00000
What's Your Reaction?






