पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत

पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत

पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड शहरांमध्ये आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक राहुल दुबाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील पोलिसांसाठी लढा उभा केला प्रत्येक पोलिसांची मदत या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येते. पोलीस पाल्यांच्या पोलिसांच्या आरोग्याच्या अनेक प्रश्न घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राहुल दुबाले यांनी सोडवले आहे. आज राहुल दुबाले यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन राहुल दुबाले यांनी पोलीस पाल्यांच्या आरक्षण व पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विषय त्यांच्यासमोर मांडला. लवकरच सोडू असे शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला. राहुल दुबाले यांच्या निवासस्थानी दुबाले परिवाराकडून देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले . यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहकार मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow