जी भूमिका घेईन ती छातीठोकपणे घेईन

Pankaja Munde is a prominent Indian politician associated with the Bharatiya Janata Party (BJP). She has been actively involved in public service and has held various significant positions in the government.

जी भूमिका घेईन ती छातीठोकपणे घेईन

 परळी विधानसभेत धक्कादायक पराभव झाल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे या सातत्याने नाराज असल्याची चर्चा होत आहे. विरोधकांनी पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजपावर जोरदार टीका केली आहे. परंतु आता भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. राजकारणात मी जी काही भूमिका घेईन ती छातीठोकपणे घेईन, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पक्षांतराचे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सुप्त संघर्ष रंगल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता पंकजा मुंडे यांनी केलेल्या नव्या वक्तव्यावरून भाजपातील वाद चव्हाट्यावर आले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरून बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला कोणतीही राजकीय भूमिका घ्यायची असेल तर मी माध्यमांना बोलावून बिनधास्त भूमिका जाहीर करेल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावणं माझा स्वभाव नाही. मला जी काही भूमिका घ्यायची आहे, ती मी छातीठोकपणे घेणार आहे. मी ठरवलेल्या भूमिकेशी आजतागायत ठाम असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली आहे. पराभव झाल्यानंतर मी विरोधक किंवा माध्यमांना अद्यापही संभ्रम निर्माण करण्याची संधी दिलेली नाही. तसेच मी अद्याप कोणतीही चर्चा ओढावून घेतलेली नसल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Download अँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow