जबरी चोरी करणाऱ्या आरोपींच्या दोन तासात स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुस्क्या

जबरी चोरी करणाऱ्या आरोपींच्या बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन तासांमध्ये मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे.
दिनांक 17/06/2023 रोजी फिर्यादी नामे बाजीराव रामकिसन सोनवणे वय 43 वर्षे व्यवसाय - व्यापार रा. शहाजानपुर (रुई) ता. जि. बीड हे नाळवंडी नाका येथुन आपले मेसचे काम करुन गावी मोटर सायकल वरुन रात्री 22.30 वा सुमारास जात असतांना अनोळखी तिन इसमानी उमरद फाटया जवळ मोटर सायकला मोटर सायकल आडवी लावुन फिर्यादीला मारहाणा करुन त्याचे ताब्यातील मोबाईल, नगदी पैसे, मोटर सायकल ( बुलेट) अशी बळजबरीने हिसकावुन चोरुन नेली वगैरे मजकुराचे फिर्यादवरून पो.स्टे. बीड ग्रामीण गुरंन 165/2023 क.394,341,506,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदरची बाब गंभीरतेने घेवून मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी वरील घटनेतील आरोपीना तात्काळ जेरबंद करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. सदर गुन्हयाचे अनुषंगाने पो. नि. स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथकाने घटनास्थळी भेट
देवून आरोपी व गेलेमालाचा शोध घेत असतांना मा. पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा 1 ) मच्छिद्र रामकिसन वनवे 2 ) अनिल ऊर्फ प्रधुम रामा डोंगरे दोन्ही रा.सावरगांव ता. गेवराई 3)गोपीनाथ ऊर्फ सोनाजी नारायण अलगुडे रा. मादळमोही ता. गेवराई जि.बीड यांनी केला आहे व ते सध्या वंजारवाडी रोड मादळमोही येथे रोडवर उभे आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाले वरुन आम्ही वंजारवाडी रोड मादळमोहि येथून ताब्यात घेवुन त्यांना नमुद गुन्हयाबाबत विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या कडुन गुन्हयातील फिर्यादीस मारहाण करुन त्याचे ताब्यातील एक मोटर सायकल (बुलेट), गुन्हयात वापरलेली बजाज कंपनीची प्लसर गाडी, मोबाईल असे एकुण 1,75,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपी नामे 1 ) मच्छिद्र रामकिसन वनवे वय 32 वर्षे 2 ) अनिल ऊर्फ प्रधुम रामा डोंगरे वय 27 वर्षे दोन्ही रा. सावरगांव ता. गेवराई 3) गोपीनाथ ऊर्फ सोनाजी नारायण अलगुडे वय 27 वर्षे रा. मादळमोही ता. गेवराई जि.बीड यांना पो.स्टे. बीड ग्रामीण गुरनं 165/2023 कलम 394,341,506, 34 भादवी चे तपासकामी पो.स्टे. बीड ग्रामीण यांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास पो.स्टे. बीड ग्रामीण व स्था. गु.शा. चे पथक करीत आहे. आरोपीता कडुन अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरिक्षक सतिष वाघ, पो. उपनि भगतसिंग दुलत, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना-सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, विकी सुरवसे, सचिन आंधळे, अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.
What's Your Reaction?






