कामगारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करावे! शफिक पेंटर

बीड (प्रतिनिधी) : बीड शहरातील नव मतदारांसाठी मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी सुरूवात झाली असून, कामगार नवमतदारांनी आपले नाव मतदान यादीत नोंदविण्यासाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन मराठवाडा बांधकाम मजूर इतर कामगार संघटना चे शफीक पेंटर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड शहरातील सर्व कामगारांनी ज्यांचे नाव मतदान यादीत समाविष्ट करण्याचे राहिलेले आहे किंवा ज्यांचे मतदान यादीच्या नावा दुरूस्ती, फोटो दुरूस्ती करायची राहिली असेल अशा सर्व नागरिकांनी मतदान यादीत नाव नोंदवावे असे आवाहन मराठवाडा बांधकाम मजूर इतर कामगार संघटना चे शफीक पेंटर यांनी केले असून काही अडचणी असतील तर सामाजिक दायित्वाने पुर्णपणे मदत करण्यात येईल असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
What's Your Reaction?






