सावधान! आज पासून 12 जून पर्यंत बीड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 08 जून 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार बीड जिल्हयासाठी दिनांक 09 जून, 2023 ते 12 जून, 2023 या दिवसासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 09 जून, 2023 ते 12 जून, 2023 या रोजी जिल्हयात तुरळक ठिकाणी ताशी 30 से 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. खबरदारीची उपायोजना म्हणुन खालील प्रमाणे काळजी घेण्यात यावी.
या गोष्टी करा :- 1. विजेच्या गडगडासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. 2. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओटयावर थांबू नका. 3. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तु त्वरित बंद करा. 4. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा. 5. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका :- 1. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. 2. घरातील बेसिन चे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणचा वापर करु नका. 3. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. 4. उंच झाडांच्या खाली आसरा घेऊ नका. 5. धातुंच्या उंच मनोज्याजवळ उभे राहू नका. 6. जर आपण घरात असाल तर उघडया दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना बाहेर पाहू नका, बाहेर थांबणे इतकेच धोकादायक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संतोष राऊत यांनी सांगीतले आहे.
What's Your Reaction?






