Ahmednagar Politics News : अखेर रोहित पवारांचा कार्यक्रम रद्द ! वाचा काय ठरलं ?

Ahmednagar Politics News :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वा जयंती उत्सव ३१ मे रोजी श्रीक्षेत्र चौंडी येथे साजरा होत आहे. गतवर्षी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चौडी येथे जयंतीचा प्रमुख कार्यक्रम झाला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवावरील वादाचे ढग अखेर शनिवारी दूर झाले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित […]

Ahmednagar Politics News : अखेर रोहित पवारांचा कार्यक्रम रद्द ! वाचा काय ठरलं ?
Ahmednagar Politics News
Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वा जयंती उत्सव ३१ मे रोजी श्रीक्षेत्र चौंडी येथे साजरा होत आहे. गतवर्षी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चौडी येथे जयंतीचा प्रमुख कार्यक्रम झाला होता.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवावरील वादाचे ढग अखेर शनिवारी दूर झाले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेण्याचा निर्णय मागे घेत शिष्टाई दाखविली, तर भाजपचे आमदार राम शिंदे यांनी पवार यांना शासकीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

त्यामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही आमदार एका व्यासपीठावर येणार का, याची जिल्ह्याला उत्सुकता आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वा जयंती उत्सव ३१ मे रोजी श्रीक्षेत्र चौंडी येथे साजरा होत आहे.

गतवर्षी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चौडी येथे जयंतीचा प्रमुख कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाची धुरा पूर्णपणे आमदार रोहित पवार यांच्याकडे होती.

त्यांनी भाजपचे आमदार राम शिंदे यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले नव्हते. शासकीय मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर व राम शिंदे यांनी व्यासपीठावर एकत्र येत भाषण केले होते. त्यामुळे चौंडी येथे तणावाचे वातावरण होते. आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे.

त्यात राम शिंदे यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळाले आहे. ते पुन्हा आमदार झाले आसून मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. यंदाच्या शासकिय सार्वजनिक उत्सव समितीचे शिंदे हेच स्वागताध्यक्ष आहेत.

त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडी येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाची येथील शासकीय विश्रामगृहात पत्र परिषद घेऊन शनिवारी माहिती दिली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच आमदार रोहित पवार यांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वतंत्र कार्यक्रमावर अक्षेप घेतला.

पण, त्यापूर्वीच आमदार रोहित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजीचा महापूजा,शोभायात्रा, महाप्रसाद, वंशाजांचा सन्मान, लोककला सादरीकरण, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान हा नियोजियक कार्यक्रम रद्द केल्याचे पत्रक काढले. त्याऐवजी त्यांनी 30 मे रोजी रात्री ते पहाटे एक वाजेपर्यंत महापूजा जलाभिषेक करण्यात येणार असून मे रोजी भाविकांसाठी विश्रांतीच व्यवस्था, महाप्रसाद तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देणार असल्यास पत्रकात म्हटले आहे .

मला बोलावले नाही, पण मी त्यांना बोलावले

शासनाच्या वतीने कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, श्रीमंत राजे यशवंतराव होळकर (तृतीय) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी मंत्री आदींना निमंत्रित करण्यात आलेले आहे. गतवर्षी चोंडी येथे उपस्थित असूनही त्यांनी बोलवले नाही. पण, मी त्यांना निमंत्रित केले असून, आमदार रोहित पवारांनी जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राम शिंदे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow