मोर्चानंतर झालेल्या दगडफेकीने गालबोट!
संगमनेरमधील भगवा मोर्चानंतर दोन गटांत तुफान दगडफेक झाली. समनापूपमधील झालेल्या राड्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिंदू समाजावर होणारे अत्याचार, लव्ह जिहाद (Love Jihad) आणि मारहाणीच्या घटनेविरोधात मंगळवारी (6 जून) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भगव्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. संगमनेर शहरात शांततेने हा मोर्चा पार पडला, परंतु मोर्चातून परतताना संगमनेर शहराजवळील समनापूर गावात दोन गटात दगडफेकीची घटना घडली. दगडफेकीमुळे काही काळी तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
समनापूर गावात झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं नुकसान झालं असून दोन जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे गावातील महिला आणि लहान मुलं घाबरुन गेले होते. दोन गटात हा राडा झाला असून सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून गावात शांततापूर्ण वातावरण आहे.
संगमनेर शहरात हिंदू संघटनांनी काढलेल्या भव्य जन आक्रोश मोर्चात तालुक्यातील नागरिकांनी आपले व्यवसाय 100 टक्के बंद ठेवला होता. हजारो मोर्चेकरी संगमनेरमधून काढण्यात आलेल्या भगव्या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चाला महिला आणि युवतींची उपस्थिती देखील लक्षणीय होती. शांततेत मोर्चा संपन्न झाला खरा, मात्र मोर्चा संपल्यावर माघारी परतणाऱ्या मोर्चेकरी आणि एका गटात समानापूर गावात दगडफेक (Samnapur Stone Pelting) झाली आणि मोर्चाला गालबोट लागलं.
What's Your Reaction?