बीड गोळीबार प्रकरणात आणखी एकास अटक
विष्णू रामभाऊ गायकवाड (वय 49 रा.चऱ्हाटा फाटा, समर्थनगर बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र ज्यात दोन तलवारी, कोयते, लोखंडी रॉड, स्टंप, कुकरी असे साहित्य त्याच्या घराजवळील गाडीत लपवून ठेवलेले होते. त्याने काढून दिल्यावरून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात सर्व आरोपींची नावे निष्पन्न झाली असून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके, शिवाजीनगरचे निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोह.गायकवाड, राठोड, सोनवणे, कांदे, सारणीकर यांनी केली. प्रदीप गायकवाडकडे पिस्तूल या प्रकरणात अटक आरोपींनी दिलेल्या माहितीवरून सर्व आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल हे प्रदीप गायकवाड स्वतःजवळ घेऊन फरार झालेला आहे. त्यासह इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
What's Your Reaction?