बीडच्या मांजरसुंबा - केज राष्ट्रीय महामार्गावर नेकनूर जवळ मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघात झाला
बापलेक आपल्या गावी निघाले, वाटेत काळाचा घाला
बीडच्या मांजरसुंबा - केज राष्ट्रीय महामार्गावर नेकनूर जवळ बाईकचा आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला. निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रीय महामार्गामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून दररोज निष्पाप लोकांचा जीव जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आंबेजोगाई - केज - मांजरसुंबा - पाटोदा या सिमेंटच्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी भेगा पडल्याने अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. आज पुन्हा दुपारच्या दरम्यान नेकनूरजवळ भीषण अपघात झाला. त्यामध्ये बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. नारेवाडी येथील विनायक दादाहरी चौरे आणि विनोद विनायक चौरे हे दोघे बापलेक बीडवरून आपल्या गावाकडे निघाले होते.
What's Your Reaction?