‘गौतमी, बोल तू होते का माझी परी?’, बीडच्या तरुणाचं पत्र व्हायरल
बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील याने गौतमी पाटीलला पत्र पाठवलंय. "गौतमी पाटील तू भारी तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी? मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे", असं रोहन याने पत्रात म्हटलं आहे.
आपल्या अदांची भुरळ घालत नजरेच्या इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या, गौतमी पाटीलची सध्या जोरदार चर्चा सुरुय. या चर्चेत पुन्हा भर पडलीय. बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला पत्र लिहीत थेट लग्नाची मागणी घातलीय. “गौतमी तुझ्या इच्छा अटी सर्वमान्य, बोल तू होती का माझी परी..” असं म्हणत आपल्या घराचा पत्ता देत लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असं देखील त्याने पत्रात म्हटलंय.
बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील याने गौतमी पाटीलला पत्र पाठवलंय. “गौतमी पाटील तू भारी तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी? मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहीण्याचे कारण की मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती कि, आता मी 25 वर्षांची आहे. लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे”, असं रोहन पाटील याने पत्रात म्हटलंय.
तरुणाने पत्रात आणखी काय-काय म्हटलंय?
“गौतमी तू मुलाखतीत म्हणालीय की, मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही. त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे. तरी तुझ्या वरील सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत”, असं रोहन आपल्या पत्रात म्हणाला आहे.
What's Your Reaction?