बीडमध्ये 19 वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार: आरोपीकडून ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार

बीड जिल्ह्यात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ वर्षाच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीला लॉजवर नेऊन जबरदस्ती केली तसेच तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केले. या घटनेत पीडितेवर १० ते १२ वेळा बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
ऐकू कमी येत असेल तर आजच व्हिआर स्पीच अँड हेअरिंग क्लिनिक ला भेट द्या
Call 9112717179 | 9657588677
घटनेचा तपशील
घटनेची सुरुवात जानेवारी २०२४ मध्ये झाली. १९ वर्षीय तरुणी वैद्यकीय पात्रता परीक्षेची तयारी करत होती आणि ती लातूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. त्यावेळी तिची सोशल मीडियावर ओळख झालेला सुरज गुंड नावाचा तरुण तेथे आला आणि लातूरला जात असल्याचे सांगत तिला त्याच्या कारमध्ये बसवले.
हॉटेलवर जबरदस्तीने बलात्कार
गुंडने केजपासून ७० किमी अंतरावर असलेल्या रेणापूर येथील एका हॉटेलवर गाडी थांबवली. त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत हॉटेलच्या रूममध्ये नेले आणि तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेत आरोपीने पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ तयार केले.
फोटो व्हायरल करण्याची धमकी
या घटनेनंतर आरोपीने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला अनेक वेळा ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
पीडितेला न्याय मिळवण्यासाठी आवाहन
हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
What's Your Reaction?






