बहुचर्चित - धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र!

बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक बिनविरोध झाली. या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येत कारखान्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बिनविरोध 21 संचालक निवडले आहेत.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन भाजप नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले आहेत. यामुळे 210 सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहेत.
कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागेसाठी 9 मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. संचालक पदाच्या 21 जागेसाठी एकूण 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 अर्ज नामंजूर झाले होते. तर 37 अर्ज मंजूर झाले.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जणांचे अर्ज शिल्लक राहीले. यामुळे 21 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये पंकजा मुंडे गटाचे 11 आणि धनंजय मुंडे गटाचे 10 उमेदवार आहेत.
What's Your Reaction?






