धोनीला का आणि कोणासाठी आणखी एक वर्ष का खेळायचे आहे?

धोनीला का आणि कोणासाठी आणखी एक वर्ष का खेळायचे आहे?

का थरारक फायनलसह आयपीएल २०२३चा शेवट झाला. पावसामुळे ही मॅच जवळ जवळ ३ दिवस चालली, ज्यात चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा अखेरच्या चेंडूवर पराभव केला आणि विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले. ही मॅच २८ मे रोजी रविवारी सुरु होणार होती पण पावसामुळे टॉस देखील झाला नाही. अखेर राखीव दिवशी म्हणजे २९ मे रोजी ही मॅच झाली. सोमवारी लढत निश्चित वेळेत सुरु झाली, मात्र पहिल्या डावातनंतर पावसाला सुरुवात झाली. मॅच पुन्हा थांबली त्यानंतर रात्री १२ नंतर म्हणजे ३० मे रोजी मॅच सुरु झाली.


चेन्नईला आयपीएलचे पाचवे विजेतेपद मिळून दिल्यानंतर धोनी निवृत्त होईल असे वाटले होते. मॅच झाल्यानंतर पाहा धोनी काय म्हणाला....

पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. ज्यावर धोनी म्हणाला, जर परिस्थिती पाहिली तर ही योग्य वेळ आहे की मी निवृत्ती घ्यावी. माझ्यासाठी हे बोलणे खुप सोप आहे की, तुमच्या सर्वांचे आभार. पण पुढील ९ महिने कठोर मेहनत घेऊन पुन्हा परत येणे आणि एक हंगाम पुन्हा खेळणे फार कठीण आहे.

धोनी पुढे म्हणाला, यासाठी माझ्या शरीराने साध दिली पाहिजे. चेन्नईच्या चाहत्यांनी जे प्रेम मला दिले आहे. आता वेळ आली आहे की मी त्यांना काही तरी दिले पाहिजे. हे माझ्याकडून त्यांना गिफ्ट असेल की मी अजून एक हंगाम त्यांच्यासाठी खेळू. त्यांनी जे प्रेम आणि उत्साह दाखवला आहे, आता मला देखील त्यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे. लोकांना मी आवडतो आणि ते माझ्यावर प्रेम करतात कारण मी जसा आहे तसा त्यांना आवडतो आणि मला स्वत:ला बदलायचे नाही.

हा माझ्या करिअरचा अखेरचा टप्पा आहे. हंगामातील पहिली लढत याच मैदानावरून झाली होती. संपूर्ण स्टेडियममध्ये माझे नाव पुकारले जात होते. चेन्नईमध्ये देखील असेच झाले. पण मी पुन्हा परत येऊन जितके खेळायचे तितके खेळणार, असे धोनी म्हणाला

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow