धक्कादायक ! पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
पुण्यात सहावी-सातवीमधील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण आले समोर. शाळेच्या समुपदेशन उपक्रमातून मुलीने शिक्षकांना याची माहिती दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : पुण्यात एका सहावी-सातवीत असणाऱ्या विद्यार्थिनिवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना कोंढवा येथे उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे ही बाब शाळेत सुरू असलेल्या समुपदेशन प्रकारातून पुढे आली आहे. मुलीने सर्व आपबीती शिक्षकांना सांगितल्यावर या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. ५५५/२३) दिली असून या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना येवलेवाडीत २०१८ ते २०१९ दरम्यान घडली.
What's Your Reaction?