Weight Loss Diet - वजन कमी करायचे मग ह्य टिप्स वापरा

Weight Loss Diet - वजन कमी करायचे मग ह्य टिप्स वापरा

आपल्या देशामध्ये कित्येक पाककृतींमध्ये डाळींचा आवर्जून समावेश केला जातो. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमुळे शरीराला पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. तसंच जेवणाच्या थाळीमध्ये तुम्हाला पौष्टिक व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वादही घेता येतो. सर्व डाळींमध्ये प्रथिने आणि आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा असतो. मूग डाळीचे सेवन करणं देखील आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते. या डाळीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई या पोषक घटकांची मात्रा सर्वाधिक आहे.

आपल्या देशामध्ये मूग डाळ तसंच हिरव्या चण्याच्या डाळीचा प्रामुख्याने खिचडी, चीला किंवा स्प्राउट्स यासारख्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. मोड आलेल्या मुगाचे सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. आहारामध्ये या डाळीचा समावेश केल्यास शरीरास कित्येक आरोग्यवर्धक फायदे मिळतील.

मूग डाळीमध्ये फायबर आणि प्रोटीनचा भरपूर साठा आहे. शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. फायबरमुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही. तर शरीरातील नुकसान झालेल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी प्रोटीनचा पुरवठा होणे गरजेचं असते. डाळ आणि तांदळामध्ये अमिनो अ‍ॅसिडची मात्रा अधिक असते. वजन घटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी डाळ-भात हा उत्तम आहार आहे. कारण याद्वारे आपल्या शरीराला नैसर्गिक स्वरुपात पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow