जीबी व्हाट्सएप आपली माहिती कशी चोरते?

जीबी व्हॉट्सॲप वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे व ते वापरणे योग्य आहे का?
हे उत्तर थोडक्यात देणं म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रायव्हसी सोबत खेळ मग आता उत्तर पण कस एकदम सविस्तर असलं पाहिजे.
काय आहे हे जीबी व्हाट्सएप?
हे एक थर्ड पार्टी अँप आहे जे एका अरेबियन डेव्हलपर ने तयार केल आहे त्याच नाव आहे ओमर.
हे फक्त एकच आहे का की ह्यासारखे अजून काही अँप आहेत?
नाही हे फक्त एक नसून ह्यासारखे अजून एप आहेत उदा. गोल्ड व्हाट्सएप, एफ एम व्हाट्सएप तर जीबी इन्स्टाग्राम पण आहे.
हे वापरायला सुरक्षित आहे का ?
ह्याच सरळ उत्तर आहे "नाही" का तर हे अँप गूगल च्या प्लेस्टोअर वर उपलब्द नाही. ते तुम्हाला बाहेरून डाउनलोड करावं लागतं आणि नंतर मोबाईल मध्ये खास परवानग्या देऊन हे तुम्हाला मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावं लागतं. गूगल प्लेस्टोअर वर ऑफिशियल असलेले अँप आपल्याला ह्या जीबी व्हाट्सएप पेक्षा कमी सुविधा देते म्हणून काही लोक हुशारी करायला हे डाउनलोड करतात पण त्यांना हे समजत नाही की तुम्ही तुमचा मोबाईल स्वतःहून हॅक करायला परवानगी देताय. हे असं झालं की आपण स्वतःहून आपल्या घरात चोराला निमंत्रण देतोय की 'ये बाबा आणि चोर माझं सामान'.
जीबी व्हाट्सएप आपली माहिती कशी चोरते?
ऑफिशियल व्हाट्सएप आपल्याला एंड टू एंड एनक्रिप्शन सुविधा देते जेनेकरून तुम्हा दोन व्यक्तींमधील संवाद व्हाट्सएप कम्पनी सुद्धा वाचू शकत नाही. पण तुम्ही जीबी व्हाट्सअप्प मध्ये चॅट करताना तुम्ही मेसेज केल्यावर तयार होणारा API जो दुसऱ्या व्यक्तीला पोहचण्या अगोदर तो जीबी कडे जातो व नंतर तो पुढे सेंड होतो. अश्या प्रकारे तुम्ही स्वतः हॅक होताय आणि समोरच्या व्यक्तीला देखील हॅक करून देताय. तसच तुम्ही कॅमेरा फोटो गॅलरी इतर गोष्टी वापरण्याची परवानगी देखील जीबी ला देता मग तो तुमच्या परस्पर तुमचे फोटो व्हिडीओ देखील अपलोड करू शकतो.
तर थोडक्यात सांगायचं झालं तर काय की जे मूळ अँप आहे ते सोडून दुसरं कोणतंही थर्ड पार्टी अँप वापरणं हे धोकादायकच आहे.
धन्यवाद...
What's Your Reaction?






