तुमच्या नावावर किती SIM आहेत?, अवघ्या दोन मिनिटात जानुन घ्या

जर तुमच्या नावावर कोणी मोबाइल नंबर वापरत असेल तर तुम्हाला कसे कळणार. त्यामुळे आता ही माहिती सुद्धा समजू शकणार आहे. तुमच्या नावावर किती मोबाइल नंबर Active आहेत. यासाठी दूरसंचार विभाग (DoT) ने एक पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in लाँच केले आहे. याच्या मदतीने तुम्ही सहज जाणून घेऊ शकाल की, तुमच्या नावावर सध्या किती मोबाइल नंबर वापरले जात आहे.
दूरसंचार विभागाचे उप संचालक जनरल ए रॉबर्ट रवी यांनी सांगितले की, दुसऱ्या डिटेल्सचा वापर करून मोबाइल सिम कार्ड घेणे हे बेकायदेशीर आहे. परंतु, अशा घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे डिपार्टमेंटने या टूलला लाँच केले आहे. या ऑनलाइन टूलच्या मदतीने जो नंबर तुम्ही वापरत नसाल अशा नंबर्सपासून तुम्ही सुटका मिळवू शकता. रॉबर्ट रवी यांनी सांगितले की, वेबसाइटद्वारे लोकांना ही माहिती मिळू शकेल की, त्यांच्या नावावर कोण-कोण सिम कार्ड वापरत आहेत. किती मोबाइल नंबर्स सुरू आहेत. यासोबतच ते या नंबर्सला ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट टाकू शकतात.
अधिकाऱ्याने सांगितले की, एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 मोबाइल कनेक्शन दिले जाऊ शकते. अनेक युजर्संच्या नावावर 9 हून जास्त मोबाइल कनेक्शन सुरू आहेत. हे पोर्टल आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या लायसन्स असलेल्या सेवा क्षेत्रात आहे. याशिवाय, या सर्विसला अन्य फेज मध्ये लागू केले जाणार आहे.
तुमच्या नावावर किती नंबर Active आहेत, असे माहिती करून घ्या
युजर्स या पोर्टलद्वारे सहज आपल्या नावावर सुरू असलेले कनेक्शनसंबंधी माहिती करू शकतात. यासाठी त्यांना आपला बी Active नंबर टाकावा लागेल. त्यानंतर एक ओटीपी मिळेल. याच्या मदतीने ते सर्व अॅक्टिव नंबर्सच्या संबंधी माहिती मिळवू शकतात. डिपार्टमेंटच्या सर्व कंज्यूमर्सला एसएमएस द्वारे याची माहिती देण्यात येते की, त्यांच्या नावावर किती नंबर्स Active आहेत. त्यानंतर कंज्युमर्स पोर्टलवर जाऊन त्या नंबर्स संबंधी रिपोर्ट करू शकतात. याचा वापर होतो की, नाही किंवा त्यांना याची गरज आहे की नाही. युजर्सच्या तक्रारीनंतर टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर या नंबरला ब्लॉक करेल किंवा त्याला Activated करेल.
What's Your Reaction?






