Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
नवी दिल्ली : इंडियन आर्मीमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर म्हणून काम करायचं असल्यास पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी येत्या 10 एप्रिलपर्यंत भारतीय सैन्यदलाच्या वेबसाईटवर अर्ज करणं आवश्यक आहे. इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करायचं असल्यास www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरील जाहिरात वाचून घ्यावी. तर, https://joinindianarmy.nic.in/jco-or-enrollment.htm या वेबसाईटवर अर्ज सादर करावेत. अग्नीवीर जनरल ड्युटी,अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लार्क, स्टोअर कीपर टेक्निकल, अग्नीवीर ट्रेडसमन, अग्नीवीर वुमन जनरल ड्युटी इन कॉर्पस ऑफ मिलिटरी पोलीस यापैकी पात्र उमेदवारांना दोन कॅटेगरींसाठी अर्ज सादर करता येतील. अग्नीवीर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय साडे सतरा वर्ष ते 21 वर्षांच्या दरम्यान असावं. 1 ऑक्टोबर 2025 ही तारीख आधारभूत मानून किमान आणि कमाल वयोमर्यादा मोजली जाईल. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं मान्यता दिलेल्या बोर्डामधून दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. पुरुष उमेदवारांना 1.6 किमी धावणे, पुलअप्स याशिवाय इतर चाचण्या द्यावा लागतील. पुरुष उमेदवार हे अविवाहित असावेत. महिला उमेदवार देखील अविवाहित असणं अपेक्षित आहे. याशिवाय विधवा, घटस्फोटित आणि कायद्याने वेगळ्या झालेल्या महिला अर्ज करु शकतात. यासाठी काही नियम लागू असतील. अग्नीवीर पदासाठी प्रवेश परीक्षा साधारणपणे जूनमध्ये घेतली जाईल. या संदर्भातील अंतिम तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. प्रवेश परीक्षा ही 13 भाषांमध्ये घेतली जाईल. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी सह इतर भाषा असतील. अग्नीवीर उमेदवारांना 30 दिवसांची रजा दरवर्षी दिली जाईल. या शिवाय आजारपणाच्या रजा वैद्यकीय स्थितीवर आधारित वैद्यकीय प्राधिकरणानं दिलेल्या सल्ल्यानुसार दिलं जाईल. अग्नीवीर म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी एकत्रित पॅकेज 30 हजारांचं मिळेल त्यापैकी 21000 पगार थेट हातात मिळेल. तर, 9000 रुपयांचा निधी अग्नीवीर कॉर्पस फंडमध्ये जमा केला जाईल. याशिवाय सरकार देखील 9000 जमा करेल. दुसऱ्य वर्षी हातात मिळणारी रक्कम 23100 तर अग्नीवीर फंडमध्ये 9900, तिसऱ्या वर्षी 25550 रुपये हातात मिळतील. तर, फंडमध्ये 10950 जमा होतील. चौथ्या वर्षी पगार 28000 हातात मिळेल. तर, 12000 रुपये अग्नीवीर फंडमध्ये जमा होतील. चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर अग्नीवीर उमेदवाराला त्याच्या योगदानाचे 5 लाख 2 हजार आणि भारत सरकारच्या योगदानाचे 5.2 लाख असे एकूण 10 लाख 4 हजार रुपये मिळतील. दरम्यान, अग्नीवीर म्हणून काम सुरु केल्यास 48 लाख रुपयांचं विमा संरक्षण त्यांना दिलं जाईल. अग्नीवीर म्हणून काम करण्याचा कालावधी चार वर्षे आहे. त्यानंतर त्यापैकी 25 टक्के अग्नीवीर भारतीय सैन्यदलात नियमित केडरमध्ये दाखल होतील. इतर बातम्या :

नवी दिल्ली : इंडियन आर्मीमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर म्हणून काम करायचं असल्यास पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी येत्या 10 एप्रिलपर्यंत भारतीय सैन्यदलाच्या वेबसाईटवर अर्ज करणं आवश्यक आहे.
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करायचं असल्यास www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरील जाहिरात वाचून घ्यावी. तर, https://joinindianarmy.nic.in/jco-or-enrollment.htm या वेबसाईटवर अर्ज सादर करावेत.
अग्नीवीर जनरल ड्युटी,अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लार्क, स्टोअर कीपर टेक्निकल, अग्नीवीर ट्रेडसमन, अग्नीवीर वुमन जनरल ड्युटी इन कॉर्पस ऑफ मिलिटरी पोलीस यापैकी पात्र उमेदवारांना दोन कॅटेगरींसाठी अर्ज सादर करता येतील.
अग्नीवीर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय साडे सतरा वर्ष ते 21 वर्षांच्या दरम्यान असावं. 1 ऑक्टोबर 2025 ही तारीख आधारभूत मानून किमान आणि कमाल वयोमर्यादा मोजली जाईल.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं मान्यता दिलेल्या बोर्डामधून दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. पुरुष उमेदवारांना 1.6 किमी धावणे, पुलअप्स याशिवाय इतर चाचण्या द्यावा लागतील. पुरुष उमेदवार हे अविवाहित असावेत. महिला उमेदवार देखील अविवाहित असणं अपेक्षित आहे. याशिवाय विधवा, घटस्फोटित आणि कायद्याने वेगळ्या झालेल्या महिला अर्ज करु शकतात. यासाठी काही नियम लागू असतील.
अग्नीवीर पदासाठी प्रवेश परीक्षा साधारणपणे जूनमध्ये घेतली जाईल. या संदर्भातील अंतिम तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. प्रवेश परीक्षा ही 13 भाषांमध्ये घेतली जाईल. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी सह इतर भाषा असतील. अग्नीवीर उमेदवारांना 30 दिवसांची रजा दरवर्षी दिली जाईल. या शिवाय आजारपणाच्या रजा वैद्यकीय स्थितीवर आधारित वैद्यकीय प्राधिकरणानं दिलेल्या सल्ल्यानुसार दिलं जाईल.
अग्नीवीर म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी एकत्रित पॅकेज 30 हजारांचं मिळेल त्यापैकी 21000 पगार थेट हातात मिळेल. तर, 9000 रुपयांचा निधी अग्नीवीर कॉर्पस फंडमध्ये जमा केला जाईल. याशिवाय सरकार देखील 9000 जमा करेल. दुसऱ्य वर्षी हातात मिळणारी रक्कम 23100 तर अग्नीवीर फंडमध्ये 9900, तिसऱ्या वर्षी 25550 रुपये हातात मिळतील. तर, फंडमध्ये 10950 जमा होतील. चौथ्या वर्षी पगार 28000 हातात मिळेल. तर, 12000 रुपये अग्नीवीर फंडमध्ये जमा होतील. चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर अग्नीवीर उमेदवाराला त्याच्या योगदानाचे 5 लाख 2 हजार आणि भारत सरकारच्या योगदानाचे 5.2 लाख असे एकूण 10 लाख 4 हजार रुपये मिळतील.
दरम्यान, अग्नीवीर म्हणून काम सुरु केल्यास 48 लाख रुपयांचं विमा संरक्षण त्यांना दिलं जाईल. अग्नीवीर म्हणून काम करण्याचा कालावधी चार वर्षे आहे. त्यानंतर त्यापैकी 25 टक्के अग्नीवीर भारतीय सैन्यदलात नियमित केडरमध्ये दाखल होतील.
इतर बातम्या :
What's Your Reaction?






