Jobs for Women: महिलांसाठी रोजगार वाढला, पण चांगल्या नोकऱ्याच नाहीत; काय सांगते आकडेवारी?

Jobs for Women: भारताचा विकास (Development of India) करायचा असेल तर, निम्म्या लोकसंख्येचे आर्थिक हात मजबूत असले पाहिजेत. जागतिक बँकेनंही (World Bank) अलिकडेच एका निवेदनात म्हटलं होतं की, भारताला प्रगतीच्या शिखरावर चढायचं असेल तर महिलांसाठी उत्तम रोजगाराच्या संधी (Better Employment Opportunities for Women) उपलब्ध करुन द्याव्या लागतील. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम (Women are Financially Empowered) झाल्या, तर भारताचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारतातील शहरी भागात महिलांमधील रोजगार वाढला आहे. महिलांचा बेरोजगारीचा दर (Unemployment Rate of Women) 8.6 टक्क्यांवर आला आहे. मात्र, अजूनही महिलांना चांगल्या नोकऱ्या (Jobs) मिळत नाहीत, ही चिंतेची बाब आहे.  पगारदार महिलांची संख्या कमी  सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर या तिमाहीत महिलांच्या बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. मात्र, त्यांना नियमित रोजगार मिळत नाही. त्यामुळे या तिमाहीत पगारदार महिलांची संख्या 55 टक्क्यांवर घसरली आहे. याशिवाय पगारदार नोकऱ्या करणाऱ्या पुरुषांची संख्याही कमी झाली आहे, ती आता फक्त 47 टक्के उरली आहे. दरम्यान, या तिमाहीतही अनियमित नोकऱ्या करणाऱ्या पुरुषांची संख्या तेवढीच राहिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शहरांमधील रोजगाराची आकडेवारी सारखीच राहिली आहे. कृषी क्षेत्रानं दिल्यात सर्वाधिक नोकऱ्या   कृषी क्षेत्रात जवळपास सर्वच नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे, तर इतर क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या घटली आहे. खरीप हंगामातील पेरण्या झाल्यामुळे कृषी क्षेत्रातील रोजगार वाढला आहे. मात्र, पेरणीचा हंगाम संपल्यानं या नोकऱ्याही गायब होतील, ही निराशाजनक बाब आहे. त्यामुळे पुढील तिमाहीतील आकडेवारी निराशाजनक असू शकते. आठवड्यातून एक तासही काम मिळालं, तर रोजगार मिळाला, असा समज होतो  सरकार दर तिमाहीत शहरी भागांत नोकरीची आकडेवारी जाहीर करतं. या सर्वेक्षणात, सर्वेक्षणाच्या वेळी सात दिवसांत एक तासही काम मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला, असंच मानलं जात आहे. बेरोजगारीच्या दरामध्ये 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश होतो.   

Jobs for Women: महिलांसाठी रोजगार वाढला, पण चांगल्या नोकऱ्याच नाहीत; काय सांगते आकडेवारी?

Jobs for Women: भारताचा विकास (Development of India) करायचा असेल तर, निम्म्या लोकसंख्येचे आर्थिक हात मजबूत असले पाहिजेत. जागतिक बँकेनंही (World Bank) अलिकडेच एका निवेदनात म्हटलं होतं की, भारताला प्रगतीच्या शिखरावर चढायचं असेल तर महिलांसाठी उत्तम रोजगाराच्या संधी (Better Employment Opportunities for Women) उपलब्ध करुन द्याव्या लागतील. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम (Women are Financially Empowered) झाल्या, तर भारताचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारतातील शहरी भागात महिलांमधील रोजगार वाढला आहे. महिलांचा बेरोजगारीचा दर (Unemployment Rate of Women) 8.6 टक्क्यांवर आला आहे. मात्र, अजूनही महिलांना चांगल्या नोकऱ्या (Jobs) मिळत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. 

पगारदार महिलांची संख्या कमी 

सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर या तिमाहीत महिलांच्या बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. मात्र, त्यांना नियमित रोजगार मिळत नाही. त्यामुळे या तिमाहीत पगारदार महिलांची संख्या 55 टक्क्यांवर घसरली आहे. याशिवाय पगारदार नोकऱ्या करणाऱ्या पुरुषांची संख्याही कमी झाली आहे, ती आता फक्त 47 टक्के उरली आहे. दरम्यान, या तिमाहीतही अनियमित नोकऱ्या करणाऱ्या पुरुषांची संख्या तेवढीच राहिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शहरांमधील रोजगाराची आकडेवारी सारखीच राहिली आहे.

कृषी क्षेत्रानं दिल्यात सर्वाधिक नोकऱ्या  

कृषी क्षेत्रात जवळपास सर्वच नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे, तर इतर क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या घटली आहे. खरीप हंगामातील पेरण्या झाल्यामुळे कृषी क्षेत्रातील रोजगार वाढला आहे. मात्र, पेरणीचा हंगाम संपल्यानं या नोकऱ्याही गायब होतील, ही निराशाजनक बाब आहे. त्यामुळे पुढील तिमाहीतील आकडेवारी निराशाजनक असू शकते.

आठवड्यातून एक तासही काम मिळालं, तर रोजगार मिळाला, असा समज होतो 

सरकार दर तिमाहीत शहरी भागांत नोकरीची आकडेवारी जाहीर करतं. या सर्वेक्षणात, सर्वेक्षणाच्या वेळी सात दिवसांत एक तासही काम मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला, असंच मानलं जात आहे. बेरोजगारीच्या दरामध्ये 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश होतो. 

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow