जाणून घ्या रडण्यामुळे शरीराला होणारे फायदे!
अनेकदा रडण्याकडे कमजोरपणाचे लक्षण म्हणून पाहिले जाते. मात्र रडल्यामुळे तुम्हाला काही फायदे होऊ शकतात. अनेक लोक सांगतात की, त्यांना रडल्यानंतर बरे वाटते. हे अगदी खरे आहे. आपला असा समज झाला आहे की, रडणे म्हणजे नकारात्मक. पुरुषांनी रडू नये, रडणे म्हणजे लहान मुलांचे लक्षण मानले जाते. मात्र रडल्यानंतर तुम्हाला चांगले वाटू शकते.
रडणे ही मानवी शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या शरीरातील कोणतीही प्रक्रिया निरूपयोगी नाही. आपल्या किमती शरीरासाठी हानिकारक नाही. जसे वेदना देखील आपल्या शरीरात सर्व काही ठीक नसल्याची सूचना देते. त्यामुळे शरीराला वेदना होणे देखील तितकेच आवश्यक आहे. रडणे देखील याच प्रमाणे कार्य करते.
अश्रूंचे तीन प्रकार :
प्रतिक्रिया देणारे अश्रू : यामध्ये धूळ किंवा धूर झाल्यानंतर येणाऱ्या अश्रूंचा समावेश होतो. ही आपल्या शरीराची संरक्षण यंत्रणा आहे.
नेहमी येणारे अश्रू : हे अश्रू आपल्या डोळ्यात ओलावा कायम ठेवतात. जेणेकरून डोळे कोरडे पडू नये.
भावनात्मक अश्रू : हे अश्रू आनंद किंवा दुःख दोन्हीही व्यक्त करताना येतात.
भावनात्मक अश्रूंचे फायदे आणि त्यामागील शास्त्रीय कारण :
तणावाचे हार्मोन्स बाहेर टाकणे : रडणे हे तणाव बाहेर टाकण्याचा एक चांगला मार्ग आहे. ज्यामुळे शरीरातून हानिकारक हार्मोन्स बाहेर पडतात.
शरीराला आराम मिळतो : रडण्यामुळे आपली पँरासिंपेथिटिक मज्जासंस्था सक्रीय होऊन विश्रांती मिळते म्हणून जर कोणी रडत असेल तर ते तणाव वाढण्यासाठी विश्रांती मिळण्यास मदत होते. मात्र जर आपण रडणे टाळत असू तर त्यामुळे आपल्या शरीरात तणाव निर्माण करणारे संप्रेरक निर्माण होतात. त्यामुळे रडणे हे नकारात्मक नसून सकारात्मक प्रतिक्रिया आहे.
मूड सुधारतो, वेदना बाहेर पडते : रडल्यामुळे ऑक्सिटोसिन आणि ऐंडोजेनस ओपिओइड्स तयार होतात. जे चांगले संप्रेरके असतात ज्यामुळे मनस्थिती सुधारून वेदना कमी होतात. त्यामुळे अश्रू येत असल्यास ते बाहेर पडू द्यावेत.
दुःख हाताळण्यास मदत : रडल्यामुळे तुमच्या वेदना बाहेर टाकण्यास मदत होते. दुःखाला प्रतिक्रिया देण्याचा सर्वात चांगला मार्ग मानला जातो. अनेक धार्मिक परंपरांमध्ये देखील रडणे हा एक भाग मानला जातो. मात्र अनेकदा आपण रडण्याचे टाळल्यामुळे भावना तशाच दडपल्या जातात आणि त्यांचं वेगवेगळ्या रोगांमध्ये रूपांतर होतं.
भावनिक संतुलन राहते : जेव्हा आपण आनंदी असताना रडतो तेव्हा देखील आपल्या भावनांचे संतुलन राखलं जातं.
चांगली झोप येण्यास मदत : एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखावले गेले असाल तर झोपण्या अगोदर त्यासाठी रडल्यास तुम्हाला नेहमीपेक्षा चांगली झोप लागते. तर रडल्यामुळे शरीराला आराम मिळून अन्नपचन झाल्याने चांगली झोप लागते.
रडणे आपल्याला आपल्या भावनांना सामोरे जाण्यात शिकवते. त्यामुळे जेव्हा रडावे वाटेल तेव्हा रडा. कारण आपल्या भावनांना सामोरे जाण्यास आपल्याला कोणीही मदत करू शकत नाही. जे की रडल्यामुळे शक्य होईल.
जर तुम्हाला इतरांसमोर रडावे वाटत नसेल तर एका बंदिस्त खोलीमध्ये किंवा आपल्या अत्यंत जवळच्या मित्रांजवळ रडा. मात्र शरीराची ही नैसर्गिक प्रक्रिया टाळू नका.
एखादी अत्यंत जुनी गोष्ट जी आज देखील तुम्हाला खूपत असेल तर त्यासाठी देखील व्यक्त व्हा. रडावे वाटत असेल तर रडा. मात्र या भावना दडपून ठेवू नका. कारण आपल्या शरीरात कोणतीही यंत्रणा अनावश्यक नाही हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे रडणे या नैसर्गिक प्रक्रियेला देखील चांगला प्रतिसाद द्या!
What's Your Reaction?