Mahesh Landge: 15 एप्रिलपर्यंत 'या' आरोपांबद्दल उत्तर द्या, न्यायालयाकडून महेश लांडगेंना नोटीस, नेमकं प्रकरण काय?

पिंपरी : भाजप आमदार महेश लांडगे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार यादीतील गैरप्रकार झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया अपेक्षित पारदर्शकतेने झाली नाही, असा आरोप करणाऱ्या निवडणूक याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती आर. आय. छागला यांनी प्राथमिक सुनावणी अंती आमदार महेश लांडगे यांना नोटीस बजावली आहे. तसेच, याचिकेतील आरोपांबाबत 15 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. भोसरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांनी भाजपच्या महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आपल्या बाजूने जनतेचा सकारात्मक कल असतानाही अचानक महेश लांडगे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे त्यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका गव्हाणे यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रीया आवले, अॅड. राजाभाऊ चौधरी यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. बोगस मतदारांची नावे? मतदार यादीत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप करत गव्हाणे यांनी याबाबत न्यायालयात लेखी तक्रार दिली आहे. एका व्यक्तीला एकाच नावाने, वयाने आणि पत्त्याने वेगवेगळे मतदान ओळखपत्र देणे, समान नाव, वय आणि मोबाईल नंबर असलेल्या अनेक व्यक्तींना मतदार यादीत समाविष्ट करणे अशा प्रकारांमुळे सुमारे 63 हजार बोगस मतदारांची नावे या यादीत आढळून आली, असा आरोप आहे. ही तक्रार मतदार यादी अंतिम करण्यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली होती, मात्र तरीही त्यावर योग्य ती कारवाई झाली नाही, असा गव्हाणे यांचा दावा आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या या गैरव्यवहारामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिली नाही आणि भाजपसह महायुतीला केंद्रित करून ईव्हीएमचा निवडक वापर करण्यात आल्याचा दावा अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे.    

Mahesh Landge: 15 एप्रिलपर्यंत 'या' आरोपांबद्दल उत्तर द्या, न्यायालयाकडून महेश लांडगेंना नोटीस, नेमकं प्रकरण काय?

पिंपरी : भाजप आमदार महेश लांडगे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार यादीतील गैरप्रकार झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया अपेक्षित पारदर्शकतेने झाली नाही, असा आरोप करणाऱ्या निवडणूक याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती आर. आय. छागला यांनी प्राथमिक सुनावणी अंती आमदार महेश लांडगे यांना नोटीस बजावली आहे. तसेच, याचिकेतील आरोपांबाबत 15 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

भोसरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांनी भाजपच्या महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आपल्या बाजूने जनतेचा सकारात्मक कल असतानाही अचानक महेश लांडगे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे त्यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका गव्हाणे यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रीया आवले, अॅड. राजाभाऊ चौधरी यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

बोगस मतदारांची नावे?

मतदार यादीत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप करत गव्हाणे यांनी याबाबत न्यायालयात लेखी तक्रार दिली आहे. एका व्यक्तीला एकाच नावाने, वयाने आणि पत्त्याने वेगवेगळे मतदान ओळखपत्र देणे, समान नाव, वय आणि मोबाईल नंबर असलेल्या अनेक व्यक्तींना मतदार यादीत समाविष्ट करणे अशा प्रकारांमुळे सुमारे 63 हजार बोगस मतदारांची नावे या यादीत आढळून आली, असा आरोप आहे.

ही तक्रार मतदार यादी अंतिम करण्यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली होती, मात्र तरीही त्यावर योग्य ती कारवाई झाली नाही, असा गव्हाणे यांचा दावा आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या या गैरव्यवहारामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिली नाही आणि भाजपसह महायुतीला केंद्रित करून ईव्हीएमचा निवडक वापर करण्यात आल्याचा दावा अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे.

 

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow