केसांमध्ये मेंदी लावण्यापूर्वी मिक्सकरा या गोष्टी
स्त्रिया नेहमी आपल्या केसांची विशेष काळजी घेत असतात कारण त्यांचे केस त्यांच्या सौंदर्यामध्ये भर घालत असतात. अशामध्ये जर केस खूपच चांगले असतील तर असे मानले जाते कि स्त्रीचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते. तर दुसरीकडे केस पांढरे आणि गुंतलेले असतील तर स्त्रीचे सौंदर्य देखील खास समोर येत नाही. काही स्त्रिया नेहमी तक्रार करत असतात कि मेंदी लावल्याने त्यांचे केस ड्राय होतात. तसे तर मार्केटमध्ये पांढऱ्या केसांना कलर करण्यासाठी अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. परंतु त्या प्रोडक्ट्सने केसांना फायदा होण्यापेक्षा जास्त नुकसानच होते. अशामध्ये केसांमध्ये मेंदी लावणेच सर्वात बेस्ट ऑप्शन आहे.
पांढऱ्या केसांना कलर किंवा कंडीशनिंग करण्यासाठी जर तुम्ही मेंदीचा उपयोग करत असाल तर मेंदी लावण्याची योग्य पद्धत देखील जाणून घेणे खूप जरुरीचे आहे नाहीतर तुमचे केस ड्राय होऊ शकतात. जर मेंदीने तुमचे केस कोरडे होत असतील तर केसांसाठी मेंदीची पेस्ट तयार करताना काही गोष्टी मिसळाव्यात यामुळे तुमचे केस ड्राय होणार नाहीत. चला तर जाणून घेऊयात कि त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या मेंदीमध्ये मिसळल्यास जास्त फायदा होतो.
अंडे केसांना पोषण देण्याबरोबर कोरडेपणापासून देखील मुक्त करते. खरे तर अंड्यामध्ये प्रोटीन, सिलिकॉन, सल्फर, विटामिन डी आणि ई असते जे केसांना पोषण देते. अंडे केसांवर सॉफ्टिंग इफेक्ट पाडते. खासकरून अंडे ड्राय केस असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
अंड्याचे प्रोटीन कंटेन्ट म्हणजेच याचा पिवळा भाग केसांना मजबूत बनवतो तर पंधरा भाग केसांना साफ करतो. थोडा वास नक्कीच येतो पण याचा वापर केल्यास तुमचे केस पहिल्यापेक्षा अधिक मुलायम, चमकदार आणि सुंदर दिसू लागतील. यासाठी तुम्हाला अंड्यामधील पूर्ण द्रव मेंदीमध्ये पूर्णपणे मिक्स करायला हवा. जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची मेंदी लावायची असेल तर आर्गेनिक मेंदी खरेदी करू शकता.
याशिवाय मेंदीमध्ये कॉफी मिसळल्यास केसांना चांगला रंग येतो. याचा आपण पावडर किंवा लिक्विड दोन्ही रुपामध्ये वापर करू शकतो. हे केसांना कलर करण्याबरोबरच केसांचा पांढरेपणा लपविण्यास देखील मदत करते. लिक्विड रुपामध्ये प्रयोग करण्यासाठी थोड्या पाण्यामध्ये कॉफी टाकून पाणी चांगले उकळून घ्यावे. हे पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये मेंदी पावडर घालून चांगली मिक्स करावी.
मेंदीमध्ये चहाच्या पत्तीचे पाणी मिक्स केल्याने देखील चांगला परिणाम मिळतो. यासाठी चहापत्ती पाण्यामध्ये चांगली उकळून मेंदीमध्ये मिक्स करावी आणि ती केसांना लावावी. रात्रभर मेंदी केसांवर तशीच राहू द्यावी. असे केल्यास केसांचा कोरडेपणा निघून जाईल आणि तुमचे केस अधिक मुलायम होतील.
मेंदीमध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्यास केसांमधील कोंडा दूर होतो आणि स्कल्पचा फंगल इन्फेक्शन देखील दूर होण्यास मदत होते. यासाठी मेंदीमध्ये लिंबाचा रस मिसळावा, दहीसुद्धा मिसळून लावू शकता.
What's Your Reaction?