MP Sujay Vikhe : खा. सुजय विखे पाटलांनी करून दाखवलं ! अहमदनगर जिल्ह्यातील तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर …
MP Sujay Vikhe : गेल्या तीस वर्षांपासून बहुचर्चित साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेश निघाला आहे. यासंबंधीचे पत्र खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, साकळाई कृती समितीच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ठेकेदार संस्थेला नगरमध्ये दिले. नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायत भागातील ३२ गावांसाठी साकळाई पाणी योजना […]



MP Sujay Vikhe : गेल्या तीस वर्षांपासून बहुचर्चित साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेश निघाला आहे. यासंबंधीचे पत्र खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, साकळाई कृती समितीच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ठेकेदार संस्थेला नगरमध्ये दिले.
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायत भागातील ३२ गावांसाठी साकळाई पाणी योजना वरदान ठरणारी आहे. ३० वर्षांपासून या योजनेची मागणी होत आहे; पण फक्त आश्वासनांशिवाय जनतेच्या पदरी काही पडत नव्हते.
२०१८ च्या लोकसभा निवडणुकीवेळी डॉ. विखे यांनी या योजनेचा पाठपुरावा सुरू केला. वाळकी (ता. नगर) येथील जाहीर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही साकळाई योजना पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले होते जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीदरम्यान साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेशाचे पत्र संबंधित ठेकेदार संस्थेला देण्यात आले.
साकळाई योजना मार्गी लागण्यासाठी साकळाई कृती समितीने वेळोवेळी आमदार, खासदार व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता. तसेच खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, साकळाई उपसा सिंचन योजनेचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी खा. डॉ. सुजय विखे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणास मंजुरी आणली होती. पण पाणी उपलब्ध प्रमाणपत्राची अट असल्यामुळे सर्व्हेक्षणास सुरुवात होत नव्हती.
ती अट वगळून नव्याने साकळाई सर्व्हेक्षणाचे आदेश राज्य सरकारने काढले होते. तसेच सर्व्हेक्षणासाठी २ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणाचा मार्ग मोकळा झाला. आता प्रत्यक्षात १८ मे २०२३ रोजी साकळाईच्या सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेश निघाला आहे.
एक वर्षात साकळाई योजनेचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. २०२२ मध्ये भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आल्यावर खा. डॉ. विखे, आ. पाचपुते, माजी आ. कर्डिले यांनी प्रयत्न सुरू केले. साकळाई योजनेचा सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेश देतेवेळी संबंधित संस्थेचे ठेकेदार गांगर्डे, जलसंपदा विभागाचे अधिकारी स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता बबन वाळके उपस्थीत होते.
What's Your Reaction?






