‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली - नसीरुद्दीन शाह

‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली - नसीरुद्दीन शाह

बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे आपल्या वक्तव्यांमुळं कायम चर्चेत येतात. आताही पुन्हा एकदा नसीरुद्दीन शाह यांनी एक मोठं वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही लोक त्यांच्या समर्थनात आहेत तर काही त्यांचा विरोध करत आहेत. आजकाल सरकारकडून लोकांच्या मनात चतुराईने मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण केला जात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

काय म्हणाले नसीरुद्दीन शाह?

द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाला मोठा विरोध होत आहे. हा चित्रपट सत्यावर आधारित नसल्याचे कमल हसनने म्हटले होते. अनुराग कश्यपने ‘द केरळ स्टोरी’ हा प्रमोशनल चित्रपट असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता नसीरुद्दीन शाह यांनीही थेट नाव न घेता या चित्रपटावर भाष्य केले.
नसीरुद्दीन शाह म्हणाले की, अलीकडच्या चित्रपटांचा मूड काही निराळाच आहे. चित्रपट प्रचारकी झाले आहेत. मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन बनली आहे. सरकार हा मुस्लिम द्वेष चित्रपटाच्या माध्यमातून पसरवत आहे, असं शाह म्हणाले.

ते म्हणाले, नक्कीच, ही फारच चिंताजनक बाब आहे. सुशिक्षित लोकांमध्येही मुस्लिमांचा द्वेष करणे ही आजकाल फॅशन बनली आहे. सत्ताधाऱ्यांनी अतिशय चतुराईने जनतेच्या मनात मुस्लिम द्वेष रुजवला आहे.

निवडणुक आयोगाच्या भूमिकेवरीही भाष्य


मत मिळवण्यासाठी धर्माचा वापर करणाऱ्या राजकारण्यांविषयी निवडणूक आयोग मूक प्रेक्षक बनून राहिला आहे, अल्लाहू अकबर म्हणत कोणत्याही मुस्लिम नेत्याने मते मागितली तर ते मोठं सकट काहींना वाटतं, असं शाह यांनी सांगितलं. ते म्हणाले, आपल्या निवडणूक आयोगाला काही कणाचा राहिला नाही. सरकार विरोधात एक शब्दही उच्चारण्याची हिंमत निवडणूक आयोग करत नाही. ‘अल्ला हु अकबर म्हणत मत द्या असं म्हणणारा एखादा मुस्लिम नेता अडचणीत येऊ शकतो. पण पंतप्रधान विखारी भाषेत भाषण करतात, मतं मागतात, तरीही त्यांचा पराभव होतो, त्यामुळं मला आशा आहे की ते संपेल, असं म्हणत कर्नाटक निवडणुकीवरून पीएम मोदींवरही टीका केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow