ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार - नितेश राणे
कारण त्यांचा तो पिंडच नाही.

भाजपचे नेते नितेश राणे यांनी यांनी आज सिंधुदूर्ग येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी मोठे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळ बळ उडाली आहे.
पुढील 1 वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे काही पक्ष बांधू शकणार नाही. कारण त्यांचा तो पिंडच नाही. म्हणून पुढील निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्ह्यावर निवडणुक लढवणार असल्याचा दावा राणेंनी केला. हा प्रस्ताव संजय राऊतच घेऊन गेलेल आहे. त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण द्यावं, असे ते म्हणाले. संपूर्ण ठाकरे गट राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे, असा दावा राणेंनी केला आहे.
संजय राऊत हे दोन वेळा यशवंतराव चव्हाण भवन व सिल्व्हर ओकवर ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्याचा प्रस्ताव घेऊन गेले आहे. त्यामुळे सध्या फक्त जागा वाटपाची नौटंकी सुरु आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.
What's Your Reaction?






