पोलिसांना पाहून पळाले अन् जाळ्यात अडकले
एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे डेबिट कार्ड हातचलाखीने काढून घेत वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून आर्थिक फसवणूक करणार्या आंतरराज्य टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी जेरबंद केले. मयंककुमार संतराम सोनकर (27, रा. द्वारका संकुल अपार्टमेंट, धानोरी, मूळ रा. हमीपूर, उत्तर प्रदेश), कपिल राजाराम वर्मा (30, रा. परांडेनगर, धानोरी, मूळ रा. बडनी, उत्तर …
एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे डेबिट कार्ड हातचलाखीने काढून घेत वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून आर्थिक फसवणूक करणार्या आंतरराज्य टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी जेरबंद केले. मयंककुमार संतराम सोनकर (27, रा. द्वारका संकुल अपार्टमेंट, धानोरी, मूळ रा. हमीपूर, उत्तर प्रदेश), कपिल राजाराम वर्मा (30, रा. परांडेनगर, धानोरी, मूळ रा. बडनी, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एटीएमकार्डद्वारे खरेदी केलेले सोने, दुचाकी, रोकड आणि विविध बँकेची तब्बल 62 एटीएम कार्ड जप्त करण्यात आली.
फिर्यादी हे 22 सप्टेंबर रोजी विश्रांतवाडी चौकातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपींनी हातचलाखीने फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या पत्नीच्या नावे असलेले बँकेचे डेबिट कार्ड चोरले. यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून या कार्डच्या साहाय्याने पैसे काढले, पोलिस अंमलदार प्रफुल्ल मोरे आणि शेखर खराडे यांना एटीएम कार्डची हेराफेरी करून फसवणूक करणारे आरोपी कस्तुरबा हाऊसिंग सोसायटीकडे जाणार्या रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएमजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लाल रंगाच्या दुचाकीवर (एमएच 12 ईझेड 3386) आलेल्या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला.
What's Your Reaction?