पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? ‘

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पक्षाबद्दल नाराजगीचा सूर बघायला मिळत आहे. त्यामुळे पंकजा मुंढे लवकरच भाजपमधून बाहेर पडतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच बुधवारी (31 मे) रोजी एका कार्यक्रमध्ये पंकजा मुंढे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांची खळबळ उडाली आहे.
त्या म्हणाल्या कि ‘मी भाजपमध्ये आहे. पण, भाजप थोडीच माझा आहे, काहीच नाही मिळालं तर ऊस तोडायला जाईल…’ त्यामुळे पंकजा मुंडे पक्षामध्ये नाराज आहे व त्या लवकरच राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे. अश्या चर्चांना सध्या ऊत आला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि ‘पंकजा मुंडे काय म्हणाल्या ही त्यांच्या पक्षाची वैयक्तिक बाब आहे, त्यांची नाराजी हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. त्यावर भाष्य करणं मला गरजेचं वाटत नाही. मात्र, पंकजा मुंडे राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे स्वागत करू, तसेच या गोष्टीचा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आहे. असं देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक दिवसांपाससून पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये याबाबतची खंत व्यक्त करून दाखवली आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार का? हे बघणे महत्वाचे ठरेल.
What's Your Reaction?






