जिल्हा रुग्णालयात अनोळखी इसमाचा मृत्यू ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

बीड (प्रतिनिधी) :- बीडच्या जिल्हा रूग्णालयात आजारी अवस्थेत उपचारासाठी दाखल झालेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून ओळख पटवण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे. मयत अनोळखी इसमाचे वय अंदाजे ५० ते ५२ वर्ष असून अंगात निळ्या रंगाचा शर्ट, उजव्या हातावर ओम असे गोंदलेले आहे. उंची अंदाजे साडेपाच फुट असून सदरील इसम जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर दि. ६ सप्टेंबर रोजी मयत झालेला आहे. सदरील व्यक्तीला कोणी ओळखत असेल किंवा त्याच्याविषयी माहिती असल्यास शिवाजीनगर पोलिस ठाणे ०२४४२- २३३०५६ आणि पोलिस हवालदार पठाण मो. ८४४६६५५९९१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






