कॉर्ल गर्लची भेट पडली लाखोंना, पुण्यातील 74 वर्षांच्या आजोबांसोबत धक्कादायक प्रकार
पुण्यात एक ज्येष्ठ नागरिकाला कॉल गर्लला भेटणं महागात पडलंय. कॉल गर्लला भेटल्यानंतर पोलिसांच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल ३० लाख रुपयांना लुबाडले. या प्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पोलिसात तक्रार दाखल केली असून एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी ३० लाख रुपयांना लुबाडल्यानंतर दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्येष्ठ नागरिकाने ज्योती नावाच्या महिलेमार्फत एका कॉल गर्लची भेट घेतली होती. भेट घेतल्यानंतर ज्योतीने ज्येष्ठ नागरिकाला फोन करून कॉल गर्लला पोलिसांनी अटक केल्याचं सांगितलं. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून तिच्या फोनमध्ये तुमच्या कॉलचे डिटेल्स आहेत. त्यामुळे पोलीस तुमचेही नाव त्यात घेतील अशी भीती ज्येष्ठ नागरिकाला घातली.
ब्लॅकमेल करत ज्येष्ठ नागरिकाकडून आरोपींनी रोख रक्कम आणि चेकद्वारे ३० लाख ३० हजार रुपये घेतले. या प्रकरणी पोलिसांनी ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
What's Your Reaction?






