राजगडावर पंचवीसहुन अधिक पर्यटक जखमी
वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राजगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यात पंचवीसहुन अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना वैद्यकीय तसेच मदतीसाठी दुपारी साडेबारा वाजता कडेकपारीतुन चढाई करत प्रशासन गडावर दाखल झाले. काही जखमी पर्यटक गडावरुन खाली उतरले. हा प्रकार रविवारी (दि. ८) सकाळी सकाळी साडे आठ सुमारास राजगडाच्या आतिदुर्गम सुवेळा माचीवर घडला. मुंबई, … The post राजगडावर मधमाश्यांचा हल्ला; पंचवीसहुन अधिक पर्यटक जखमी appeared first on पुढारी.
राजगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यात पंचवीसहुन अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना वैद्यकीय तसेच मदतीसाठी दुपारी साडेबारा वाजता कडेकपारीतुन चढाई करत प्रशासन गडावर दाखल झाले. काही जखमी पर्यटक गडावरुन खाली उतरले. हा प्रकार रविवारी (दि. ८) सकाळी सकाळी साडे आठ सुमारास राजगडाच्या आतिदुर्गम सुवेळा माचीवर घडला.
मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणचे चाळीसहून अधिक पर्यटक सुवेळा माची परिसरात भ्रमण करत होते. त्यावेळी कड्याच्या कातर खडकातील भल्या मोठ्या आग्या मोहळाच्या माशांनी पर्यटकांवर तुफान हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी पर्यटक सैरावैरा पळत सुटले. काही अरुंद पाऊल वाटेवर घसरून पडलेल्या पर्यटकांवर हल्ला करून मधमाश्यांनी चावा घेतला. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले.
राजगडावरील पुरातत्व खात्याचे पाहरेकरी बापु साबळे, विशाल पिलावरे यांनी काही पर्यटकांच्या मदतीने जखमींना सुवेळा माचीवरुन बाहेर काढण्यासाठी धाव घेतली; मात्र दुर्गम कडे कपारीतुन जखमींना स्टेचर तसेच मिळेल त्या साहित्याच्या आधाराने कसेबसे पदमावती माचीवरील राजसदरेवर आणण्यखत आले.
पाहरेकरी बापु साबळे म्हणाले, मधमाश्यांनी चावा घेतल्याने काही जणांना उलट्या होऊन ते बेशुद्ध पडले आहेत. त्यांना गडाच्या पायथ्याला घेऊन जाण्यासाठी वेळ लागणार आहे तसेच तातडीच्या मदतीसाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. वेल्हेचे तहसीलदार दिनेश पारगे म्हणाले, जखमी पर्यटकांना तातडीने उपचार मिळावे यासाठी शासकीय रुग्णवाहिकेचे तसेच जवळील डॉक्टरांना गडावर जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे
What's Your Reaction?