लठ्ठपणा कमी करा

Weight Loss Tips शरीराचे वजन अतिरिक्त प्रमाणात वाढल्यास अन्य आजारांनाही आयते निमंत्रण मिळते. यामुळे भविष्यात गंभीर समस्या उद्भवू शकता. या समस्या टाळण्यासाठी नियमित व्यायाम करावा.

लठ्ठपणा कमी करा

दोन्ही पाय 90अंशांत वर उचलणे. दोन्ही पाय जोडून गोलाकार फिरवणे. प्रथम छोटे वर्तुळ बनवणे. त्यानंतर हळूहळू एकेक वेढा वाढवत मोठे वर्तुळ तयार करणे. पाच आकड्यांत छोट्या वर्तुळापासून मोठे वर्तुळ तयार करणे आणि तसेच उलट दिशेने मोठ्या वर्तुळापासून हळूहळू 90 अंशांमध्ये पाय सरळ करणे.

दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पवनमुक्तासनाची स्थिती घेणे. हळूहळू गुडघे गोलाकार फिरवणे. पाय पूर्ण पोटाशी आल्यानंतर पवनमुक्तासनाची स्थिती होईल. पाच सरळ आणि पाच उलट दिशेने ही क्रिया करणे.

90 अंशांमध्ये पाय सरळ करणे. पाय एकमेकांपासून वेगळे करणे. हळूहळू जमिनीच्या दिशेने खाली आणणे. पाय गुडघ्यात न वाकवता दोन्ही पाय एकमेकांना जोडणे. सावकाश 90 अंशांत पाय परत वर उचलणे. असे पाच वेळा करणे. उलट क्रिया : 90 अंशांत जोडलेले पाय जमिनीपर्यंत खाली आणणे. तिथे पायात अंतर घेऊन दोन्ही पाय 90 अंशांत वर उचलणे.

सर्व प्रकार नव्याने करत असताना सुरुवात पाच सरळ, पाच उलटपासून करावी. हळूहळू 10 ते 15 वेळेस सरळ आणि उलट ही क्रिया करावी. योग्य सराव झाल्यानंतर या व्यायामाची तीन आवर्तने करावीत. डिलिव्हरीनंतर पोट सुटते. पोटाचा टोन खूप कमी झालेला असतो. अशा वेळेस जठर परिवर्तनाने पोटाच्या स्नायूंचा टोन वाढण्यास मदत होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow