Rohit Pawar : सप्टेंबरमध्ये केंद्रात काही मोठा बदल होण्याची शक्यता, म्हणूनच मोदी नागपुरात आले : रोहित पवार
अहिल्यानगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूरच्या दौऱ्यावर होते. बऱ्याच दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरएसएस च्या कार्यक्रमात सहभागी झाले. याबाबत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तो त्यांचा व्यक्तिगत कार्यक्रम होता. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे कदाचित पहिल्यांदाच आरएसएसच्या कार्यक्रमाला आले असावेत असं रोहित पवार म्हणाले. केंद्रीय स्तरावर काही वेगळा निर्णय भाजपकडून होतो की काय असं सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. आरएसएसकडून देखील काही वेगळा निर्णय घेतला जाईल का अशी चर्चा सुरू असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. युवा पीढी संघटनेत चांगलं काम करेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या भाषणामध्ये बोलताना आम्ही आता आमच्या जबाबदारी युवा पिढीकडे देणार आहोत असं म्हणाले. युवा पीढी अशा पद्धतीने चांगल्या कुस्ती स्पर्धा घेते आहे हे बघून समाधान वाटतं असं देखील ते भाषणात म्हणाले. या वक्तव्यानंतर रोहित पवार यांच्यावर शरद पवार नवी जबाबदारी देणार का अशी चर्चा रंगू लागली. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, कुस्ती खेळामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवा पिढीला विश्वासात घेऊन काम करण्याचा विचार शरद पवारांनी व्यक्त केला आहे. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्व युवा पिढी संघटनेत काम करेल असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. कर्जत शहरात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने, आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना झाला त्यात सोलापूरचा वेताळ शेळके हा 66 वा महाराष्ट्र केसरी झाला. ही स्पर्धा अतिशय पारदर्शकपणे पार पडली असं मत स्पर्धेचे आयोजक आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी झालेल्या वेताळ शेळके याने उपविजेता पृथ्वीराज पाटील याला खांद्यावर घेऊन खेळाडू वृत्ती दाखवली असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केल. सोबतच यावरून त्यांनी नाव न घेता, अहिल्यानगर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेबाबत टीका केली त्या लोकांनी यातून शिकलं पाहिजे असा टोला लगावला. शाब्बास वेताळ!!!वेताळ शेळके ठरला ६६ वा महाराष्ट्र केसरी!महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके याचं मनःपूर्वक अभिनंदन!!!आक्रमक लढत दिल्याबद्दल उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याचंही अभिनंदन!#महाराष्ट्र_केसरी_२०२५ | #महाकेसरी | #MaharashtraKesari | pic.twitter.com/TK4BYJUcpS — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 30, 2025 ही बातमी वाचा: Vetal Shelke : शेतकरी कुटुंबातील वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी, सोलापुरातील बेंबळे गावात गुढीपाडव्यादिवशी दिवाळी साजरी

अहिल्यानगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूरच्या दौऱ्यावर होते. बऱ्याच दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरएसएस च्या कार्यक्रमात सहभागी झाले. याबाबत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तो त्यांचा व्यक्तिगत कार्यक्रम होता. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे कदाचित पहिल्यांदाच आरएसएसच्या कार्यक्रमाला आले असावेत असं रोहित पवार म्हणाले. केंद्रीय स्तरावर काही वेगळा निर्णय भाजपकडून होतो की काय असं सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. आरएसएसकडून देखील काही वेगळा निर्णय घेतला जाईल का अशी चर्चा सुरू असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
युवा पीढी संघटनेत चांगलं काम करेल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या भाषणामध्ये बोलताना आम्ही आता आमच्या जबाबदारी युवा पिढीकडे देणार आहोत असं म्हणाले. युवा पीढी अशा पद्धतीने चांगल्या कुस्ती स्पर्धा घेते आहे हे बघून समाधान वाटतं असं देखील ते भाषणात म्हणाले. या वक्तव्यानंतर रोहित पवार यांच्यावर शरद पवार नवी जबाबदारी देणार का अशी चर्चा रंगू लागली.
यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, कुस्ती खेळामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवा पिढीला विश्वासात घेऊन काम करण्याचा विचार शरद पवारांनी व्यक्त केला आहे. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्व युवा पिढी संघटनेत काम करेल असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.
कर्जत शहरात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने, आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना झाला त्यात सोलापूरचा वेताळ शेळके हा 66 वा महाराष्ट्र केसरी झाला. ही स्पर्धा अतिशय पारदर्शकपणे पार पडली असं मत स्पर्धेचे आयोजक आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी झालेल्या वेताळ शेळके याने उपविजेता पृथ्वीराज पाटील याला खांद्यावर घेऊन खेळाडू वृत्ती दाखवली असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केल. सोबतच यावरून त्यांनी नाव न घेता, अहिल्यानगर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेबाबत टीका केली त्या लोकांनी यातून शिकलं पाहिजे असा टोला लगावला.
शाब्बास वेताळ!!!
वेताळ शेळके ठरला ६६ वा महाराष्ट्र केसरी!
महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके याचं मनःपूर्वक अभिनंदन!!!
आक्रमक लढत दिल्याबद्दल उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याचंही अभिनंदन!#महाराष्ट्र_केसरी_२०२५ | #महाकेसरी | #MaharashtraKesari | pic.twitter.com/TK4BYJUcpS — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 30, 2025
ही बातमी वाचा:
What's Your Reaction?






