पुणे सायबर पोलिसांनी आवळल्या शाहरुख खानच्या मुसक्या

आपण जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख असल्याची बतावणी करून जुने फर्निचर स्वस्तात विक्रीच्या आमिषाने 70 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या चोरट्याला सायबर पोलिसांनी राजस्थानातून अलवर जिल्ह्यातून अटक केली. शाहरूख खान (वय 23, रा.खानजादवाडी, अलवर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी खान याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

पुणे सायबर पोलिसांनी आवळल्या शाहरुख खानच्या मुसक्या

आपण जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख असल्याची बतावणी करून जुने फर्निचर स्वस्तात विक्रीच्या आमिषाने 70 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या चोरट्याला सायबर पोलिसांनी राजस्थानातून अलवर जिल्ह्यातून अटक केली. शाहरूख खान (वय 23, रा.खानजादवाडी, अलवर, राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी खान याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार पत्रकाराने समाजमाध्यमातील संदेश सुविधेद्वारे तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख बोलत असल्याची बतावणी खानने तक्रारदाराकडे केली होती. माझा मित्र संतोषकुमार केंद्रीय सुरक्षा दलात नियुक्तीस आहे. त्याला जुने फर्निचर विकायचे आहे, असे सांगितले. खानने फर्निचर स्वस्तात विक्रीचे आमिष दाखवून ऑनलाइन पद्धतीने 70 हजार रुपये घेतले. त्यानंतर फर्निचर पाठविले नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक तुषार भोसले, राजकुमार जाबा आदींनी तपास करून खानला अलवर शहरातून अटक केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow