Shirdi Airport : आनंदाची बातमी! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठरणार केंद्रबिंदू
Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) नाईट लँडिंग (Night Landing) सुविधा सुरू झालीये. 60 प्रवाशांना घेऊन हैदराबाद (Hyderabad) येथून पहिलेच विमान रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झाले. विमान दाखल होताच वॉटर सॅल्युट करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचे फुल आणि साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केलंय. 2018 साली शिर्डीत विमानतळ सुरू झाल्यानंतर आजतागायत हजारो प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतलाय. शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओढा लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने साईभक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. ही सुविधा सुरू होताच शिर्डी विमानतळावर पहिल्याच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पुष्प, साईबाबांचा प्रसाद देऊन तसेच केक कापून करण्यात आले. कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू : सुजय विखे पाटील दरम्यान, नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार आहे. याठिकाणी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासह विमानसंख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे. अमरावती विमानतळावर प्रथमच एटीआर-72 चाचणी दरम्यान,अमरावती विमानतळावर प्रथमच एटीआर-72 चाचणी विमान यशस्वीरीत्या उतरले आणि यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या विमानतळ विकासाच्या दिशेने हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. प्रादेशिक संपर्क योजना (आरसीएस) – उडान अंतर्गत व्यावसायिक विमान सेवेसाठी या विमानतळाची पूर्ण तयारी असल्याचे दाखवणारे हे विशेष चाचणी विमान इंदौरहून अमरावतीला आले. हे केवळ एक विमान नव्हते, तर दीर्घ प्रतीक्षेनंतर हवाई प्रवासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होती. अमरावती विमानतळाचे भव्य उद्घाटन आता जवळ आले आहे, आणि हे विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी गेमचेंजर ठरणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) तर्फे उडान योजनेअंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर उद्योग, व्यवसाय आणि प्रवाशांसाठी सुवर्णद्वार ठरणार आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Shirdi News : साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ? Trimbakeshwar Temple : आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात

Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) नाईट लँडिंग (Night Landing) सुविधा सुरू झालीये. 60 प्रवाशांना घेऊन हैदराबाद (Hyderabad) येथून पहिलेच विमान रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झाले. विमान दाखल होताच वॉटर सॅल्युट करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचे फुल आणि साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केलंय.
2018 साली शिर्डीत विमानतळ सुरू झाल्यानंतर आजतागायत हजारो प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतलाय. शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओढा लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने साईभक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. ही सुविधा सुरू होताच शिर्डी विमानतळावर पहिल्याच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पुष्प, साईबाबांचा प्रसाद देऊन तसेच केक कापून करण्यात आले.
कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू : सुजय विखे पाटील
दरम्यान, नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार आहे. याठिकाणी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासह विमानसंख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे.
अमरावती विमानतळावर प्रथमच एटीआर-72 चाचणी
दरम्यान,अमरावती विमानतळावर प्रथमच एटीआर-72 चाचणी विमान यशस्वीरीत्या उतरले आणि यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या विमानतळ विकासाच्या दिशेने हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. प्रादेशिक संपर्क योजना (आरसीएस) – उडान अंतर्गत व्यावसायिक विमान सेवेसाठी या विमानतळाची पूर्ण तयारी असल्याचे दाखवणारे हे विशेष चाचणी विमान इंदौरहून अमरावतीला आले. हे केवळ एक विमान नव्हते, तर दीर्घ प्रतीक्षेनंतर हवाई प्रवासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होती. अमरावती विमानतळाचे भव्य उद्घाटन आता जवळ आले आहे, आणि हे विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी गेमचेंजर ठरणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) तर्फे उडान योजनेअंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर उद्योग, व्यवसाय आणि प्रवाशांसाठी सुवर्णद्वार ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
What's Your Reaction?






