आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाची ५ जागांसाठी तयारी; मराठा आरक्षणावर ज्योती मेटे यांचा सरकारला सवाल
दीपक जाधव, बीड: शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. शिवाय, मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेची घोषणा होताच, त्यांच्याशी संपर्क साधणार असल्याचं मेटे यांनी सांगितलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत सहा वेळा उपोषण करत मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 28 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.
ऐकू कमी येत असेल तर आजच व्हिआर स्पीच अँड हेअरिंग क्लिनिक ला भेट द्या
Call 9112717179 | 9657588677
मराठा आरक्षणावर ज्योती मेटे यांचा सवाल
ज्योती मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे, "मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेबद्दल सरकारने काय केले?" त्यांनी असेही म्हटले की, या मुद्द्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक आहे, ज्यात सर्व समाज घटक आणि कायदे तज्ञांचा सहभाग असावा.
शिवसंग्राम पक्ष पाच विधानसभा मतदारसंघांत निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. स्व. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला होता, त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. जरांगे पाटील यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केल्यानंतर, त्यांच्याशी चर्चा करून आगामी वाटचाल ठरवण्यात येणार असल्याचं मेटे यांनी सांगितलं.
What's Your Reaction?