सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार ! मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे

Maharashtra News : मराठा आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ही लढाई सर्व मराठा बांधवांची आहे. त्यामुळे सर्व मराठा बांधवांनी १४ ऑक्टोबर रोजी सराटी (जि. जालना) येथे यावे. तेथील गर्दी पाहून सरकारने ४ दिवसात आरक्षण निर्णय काढला पाहिजे. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. जामखेड तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.६) सायंकाळी झालेल्या विराट सभेस मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. यावेळी लहान मुलींच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. जरांगे पाटील बोलताना पुढे म्हणाले की, सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी विविध प्रकारचे षडयंत्र आखले. परंतु मी कोणत्याही षडयंत्राला घाबरलो नाही. त्यामुळे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी येणार नाही असा घणाघात यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारवर केला आहे. आरक्षण प्रश्नी सरकारने अनेक डाव टाकले पण मी पण गोदाकाठचा मराठा असल्याने त्यांचे सर्व डाव उधळून लावले. तसेच २००४ च्या मराठा आरक्षण प्रकरणी सरकारने त्या शासन निर्णयाच्या अटी व शर्व काढल्या तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतु सरकार मराठा आरक्षण द्यायचे नाही म्हणून पळवाटा काढण्याचा प्रगत करत असल्याचे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. तसेच मराठा आरक्षणासाठी दुसरा पर्याय देखील दिला असून मराठा समाजाला मागास म्हणून आरक्षण देता येत आहे. परंतु ते ५० सरकार करत नाही त्यामुळे सरकारने ४० दिवस मुदत मागितली. ती वेळ त्यांना दिली आहे. त्यामुळे ४० दिवस संपण्याच्या अगोदर मराठा आरक्षण प्रश्न सरकारने मार्गी लावावा अन्यथा आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा मराठा आरक्षण मनोज जरांगे यांच्या जामखेड येथील मराठा आरक्षणाबाबत महासभेमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने लहान बालकाच्या हस्ते आरक्षणाला पत्र देण्यात आले. तसेच समेत उपस्थित मराठा बांधवासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने फळ आणि नाष्टयाची व्यवस्था तर डॉ पन्हळकर यांनी पाण्याची व्यवस्था केली होती.

सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार ! मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे

Maharashtra News : मराठा आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ही लढाई सर्व मराठा बांधवांची आहे.

त्यामुळे सर्व मराठा बांधवांनी १४ ऑक्टोबर रोजी सराटी (जि. जालना) येथे यावे. तेथील गर्दी पाहून सरकारने ४ दिवसात आरक्षण निर्णय काढला पाहिजे. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

जामखेड तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या विराट सभेस मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. यावेळी लहान मुलींच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

जरांगे पाटील बोलताना पुढे म्हणाले की, सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी विविध प्रकारचे षडयंत्र आखले. परंतु मी कोणत्याही षडयंत्राला घाबरलो नाही. त्यामुळे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी येणार नाही असा घणाघात यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारवर केला आहे.

आरक्षण प्रश्नी सरकारने अनेक डाव टाकले पण मी पण गोदाकाठचा मराठा असल्याने त्यांचे सर्व डाव उधळून लावले. तसेच २००४ च्या मराठा आरक्षण प्रकरणी सरकारने त्या शासन निर्णयाच्या अटी व शर्व काढल्या तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतु सरकार मराठा आरक्षण द्यायचे नाही म्हणून पळवाटा काढण्याचा प्रगत करत असल्याचे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.

तसेच मराठा आरक्षणासाठी दुसरा पर्याय देखील दिला असून मराठा समाजाला मागास म्हणून आरक्षण देता येत आहे. परंतु ते ५० सरकार करत नाही त्यामुळे सरकारने ४० दिवस मुदत मागितली. ती वेळ त्यांना दिली आहे. त्यामुळे ४० दिवस संपण्याच्या अगोदर मराठा आरक्षण प्रश्न सरकारने मार्गी लावावा अन्यथा आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow