ऊस गेला की पैसे देतो, सावकाराकडून कर्ज घेतलं

सावकाराकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून बीडच्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ऊस गेला की पैसे देतो असं सांगूनही सावकार ऐकत नसल्याचं पाहून तरुणाने टेन्शनमध्ये आत्महत्येचं पाऊल उचललं. सध्या त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ऊस गेला की पैसे देतो, सावकाराकडून कर्ज घेतलं

शेख असेफ नियाझुद्दीन याने एका खाजगी महिला सावकाराकडून पैसे घेतले होते. सदरील पैसे ऊस तोडणी करून आल्यानंतर परत केले जाणार होते. मात्र सावकाराकडून सतत दबाव येत असल्याने या युवकाने सुसाईड नोट लिहित आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सावकार की बोकाळली आहे. यामध्ये अनेक शेतकरी सावकाराच्या दबावाच्या ओझ्याखाली आपलं आयुष्य संपवत आहे. सावकाराच्या जाचातून सुटताना अनेक जण आपला त्रास कोणालाही सांगत नाहीयेत. बेकायदेशीर सावकारकी करत बेहिशोबी टक्केवारी लावून सावकार मंडळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत. अनेक वेळा यात चक्रवाढ व्याज लावल्याचीही प्रकरणं समोर आली आहेत. हे सावकार समोरच्याकडून अधिकचा पैसा वसूल करत आहेत. पैसा वसूल करण्यासाठी सावकार मंडळी अनेक फंडे वापरत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow