अपस्माराचा मुकाबला कसा करावा?
फिट्स येणे, आकडी येणे यावर प्रत्येक उपचार शास्त्रांमध्ये बरेच संशोधन झाले आहे. चेतनसंस्थेचा हा विकार असून मेंदू व मज्जारज्जूच्या कार्यावर यांचे प्राबल्य आढळून येते. लहान मुलांच्यात हा विकार जास्त आढळतो. तसे असले तरी सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष या आजाराने त्रस्त दिसतात. Epilepsy हा आजार अगदी लहान वयात झाला तरी मानसिक वाढीवर परिणाम होतो. मध्यम वयात त्रास … The post अपस्माराचा मुकाबला कसा करावा? appeared first on पुढारी.
फिट्स येणे, आकडी येणे यावर प्रत्येक उपचार शास्त्रांमध्ये बरेच संशोधन झाले आहे. चेतनसंस्थेचा हा विकार असून मेंदू व मज्जारज्जूच्या कार्यावर यांचे प्राबल्य आढळून येते. लहान मुलांच्यात हा विकार जास्त आढळतो. तसे असले तरी सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष या आजाराने त्रस्त दिसतात. Epilepsy
हा आजार अगदी लहान वयात झाला तरी मानसिक वाढीवर परिणाम होतो. मध्यम वयात त्रास असेल तर रुग्णावर सामाजिक, वैयक्तिकरित्या बरीच बंधने येतात. पण यावर अनेक भोंदू लोकांकडून उपचार करून घेणे मात्र टाळावे. अपस्मार हा रोग मेंदू व चेतनतंतूच्या संदेशवहन यंत्रणेत बिघाड झाल्याने चुकीचे संदेश जातात व चुकीचे कार्य स्नायूंकडून घडवले जाते, अशी क्रिया इपिलेप्सीमध्ये होत असते. इपिलेप्सीला अपस्मार म्हणतात. अनुवंशिकता, गर्भावस्थेत होणारे दुष्परिणाम, डोक्याला चढणारा ताप, विलक्षण मानसिक व शारीरिक ताण, पचनाच्या तीव्र तक्रारी यामुळे अपस्मार हा आजार उद्भवतो. Epilepsy
अपस्माराचे दोन प्रकार आहेत. ग्रँडमाल आणि पेटेमाल. ग्रैंडमाल या प्रकारात प्रथम रुग्णाला अस्वस्थ वाटते. काही विचित्र भावना अनुभवायला येतात. पोटात काहीतरी गोल फिरत आहे, असा अनुभव येतो. काही स्नायू उगाचच थरथरत राहतात. मान वाकडी होते. दातखीळ बसते. तोंडातून फेस येतो.
पेटमाल या प्रकारात अपस्माराचा झटका (Epilepsy) अगदी नाममात्र असतो. रुग्णाला स्नायूंच्या होणाऱ्या विशिष्ट हालचाली अनुभवता येतात. डोळे, डोके, अंग, हात, पाय यांच्या विचित्र हालचाली होतात. पण क्षणार्धात पूर्वत होतात. पण असा प्रकार कधीही अचानकपणे होऊ शकतो. या प्रकारात विस्तवाकडे पाहिल्याने, किंचाळल्याने आणि काही विशिष्ट औषधांनी फिट्स येऊ शकतात.
या आजाराचा उपचार घरगुती करू नये, वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपचार करावा. नाहीतर रुग्णाच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल.
हेही वाचा :
- ‘फिट्स’चा त्रास का हाेताे? जाणून घ्या कारणे आणि लक्षणे
- Epilepsy Symptoms : ‘अपस्मार’वर वेळीच उपचार आवश्यक
- अपस्माराचा मुकाबला
The post अपस्माराचा मुकाबला कसा करावा? appeared first on पुढारी.
What's Your Reaction?