अमेरिकेच्या बोईंग कंपनीना मोठा निर्णय, बंगळुरुच्या तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Boeing : अमेरिकेच्या बोईंग कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीने भारतातही कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. बोईंगने बंगळुरु तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जगभरात चालू असलेल्या आर्थिक आव्हानांमुळं कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे. बोइंगचे भारतात सुमारे 7000 कर्मचारी  अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगने जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याची योजना आखली आहे. या अंतर्गत कंपनीने बंगळुरु येथील आपल्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. माहितीनुसार, जागतिक स्तरावर अनेक आव्हानांचा सामना करत असलेल्या बोइंगचे भारतात सुमारे 7000 कर्मचारी आहेत. भारत ही कंपनीसाठी मोठी बाजारपेठ आहे. गेल्या वर्षी बोईंगने जागतिक स्तरावर त्यांच्या सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांची काढणी जाहीर केली होती. जागतिक स्तरावरील कामगार कमी करण्याचा एक भाग म्हणून, बोईंगने बंगळुरूमधील त्याच्या बोईंग इंडिया इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी सेंटरमधील 180 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या संदर्भात बोईंगकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या टाळेबंदीचा त्यांच्या ग्राहकांसह आणि सरकारच्या कामकाजावर परिणाम होणार नाही असे कंपनीने सांगतिले आहे. कंपनीने धोरणात्मक समायोजन केले आहे, ज्यामुळे मर्यादित संख्येच्या पदांवर परिणाम झाला आहे. बंगळुरु आणि चेन्नई येथील बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र (BIETC) जटिल आधुनिक वैमानिक कार्य करते. बंगळुरुमधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान परिसर हा कंपनीच्या यूएस बाहेरील सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एक आहे. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, बोईंग भारतातील 300 पेक्षा जास्त पुरवठादारांकडून दरवर्षी सुमारे 1.25 बिलियन डॉलरची खरेदी करते. जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकरकपात (Layoffs) केली आहे. वाढता खर्च आणि सध्या सुरु असेललं मंदीचं वातावरण यामुळं नोकरकपात सुरु आहे. बोईंगचा व्यवसाय जगातील 150 देशांमध्ये बोईंग ही जगातील सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. बोइंग ही अमेरिकेची सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे ज्याचा व्यवसाय जगातील 150 देशांमध्ये पसरलेला आहे. या कंपनीसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. 2021 मध्ये त्याची विक्री 62.3 अब्ज डॉलर होती आणि ती फॉर्च्यून 500 यादीत 54 व्या स्थानावर होती. अलिकडच्या वर्षांत, 737 MAX क्रॅश (2018-2019) आणि उत्पादन विलंब यासारख्या समस्यांमुळे त्याचा व्यवसाय आणि प्रतिष्ठा प्रभावित झाली आहे. महत्वाच्या बातम्या: Boeing Layoffs : 33000 कर्मचारी संपावर, कंपनीचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका, अनेकांना देणार नारळ

अमेरिकेच्या बोईंग कंपनीना मोठा निर्णय, बंगळुरुच्या तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Boeing : अमेरिकेच्या बोईंग कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीने भारतातही कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. बोईंगने बंगळुरु तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जगभरात चालू असलेल्या आर्थिक आव्हानांमुळं कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे.

बोइंगचे भारतात सुमारे 7000 कर्मचारी 

अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगने जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याची योजना आखली आहे. या अंतर्गत कंपनीने बंगळुरु येथील आपल्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. माहितीनुसार, जागतिक स्तरावर अनेक आव्हानांचा सामना करत असलेल्या बोइंगचे भारतात सुमारे 7000 कर्मचारी आहेत. भारत ही कंपनीसाठी मोठी बाजारपेठ आहे.

गेल्या वर्षी बोईंगने जागतिक स्तरावर त्यांच्या सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांची काढणी जाहीर केली होती. जागतिक स्तरावरील कामगार कमी करण्याचा एक भाग म्हणून, बोईंगने बंगळुरूमधील त्याच्या बोईंग इंडिया इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी सेंटरमधील 180 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या संदर्भात बोईंगकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या टाळेबंदीचा त्यांच्या ग्राहकांसह आणि सरकारच्या कामकाजावर परिणाम होणार नाही असे कंपनीने सांगतिले आहे. कंपनीने धोरणात्मक समायोजन केले आहे, ज्यामुळे मर्यादित संख्येच्या पदांवर परिणाम झाला आहे. बंगळुरु आणि चेन्नई येथील बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र (BIETC) जटिल आधुनिक वैमानिक कार्य करते.

बंगळुरुमधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान परिसर हा कंपनीच्या यूएस बाहेरील सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एक आहे. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, बोईंग भारतातील 300 पेक्षा जास्त पुरवठादारांकडून दरवर्षी सुमारे 1.25 बिलियन डॉलरची खरेदी करते. जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकरकपात (Layoffs) केली आहे. वाढता खर्च आणि सध्या सुरु असेललं मंदीचं वातावरण यामुळं नोकरकपात सुरु आहे.

बोईंगचा व्यवसाय जगातील 150 देशांमध्ये

बोईंग ही जगातील सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. बोइंग ही अमेरिकेची सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे ज्याचा व्यवसाय जगातील 150 देशांमध्ये पसरलेला आहे. या कंपनीसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. 2021 मध्ये त्याची विक्री 62.3 अब्ज डॉलर होती आणि ती फॉर्च्यून 500 यादीत 54 व्या स्थानावर होती. अलिकडच्या वर्षांत, 737 MAX क्रॅश (2018-2019) आणि उत्पादन विलंब यासारख्या समस्यांमुळे त्याचा व्यवसाय आणि प्रतिष्ठा प्रभावित झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Boeing Layoffs : 33000 कर्मचारी संपावर, कंपनीचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका, अनेकांना देणार नारळ

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow