अहमदनगर : आधी लिफ्ट, नंतर चाकूने भोसकले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर येथील गोंधवणी परिसरात राहणार्‍या तरुणाचा शुक्रवारी (दि.7) रात्री पुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यावर खून झाला होता. या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तरुणाला लुटण्यासाठी आरोपींनी आधी दुचाकीवरून त्याला लिफ्ट दिली आणि नंतर चाकूने भोसकून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. किरण सुरेश काकफळे … The post अहमदनगर : आधी लिफ्ट, नंतर चाकूने भोसकले appeared first on पुढारी.

अहमदनगर : आधी लिफ्ट, नंतर चाकूने भोसकले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर येथील गोंधवणी परिसरात राहणार्‍या तरुणाचा शुक्रवारी (दि.7) रात्री पुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यावर खून झाला होता. या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तरुणाला लुटण्यासाठी आरोपींनी आधी दुचाकीवरून त्याला लिफ्ट दिली आणि नंतर चाकूने भोसकून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. किरण सुरेश काकफळे (वय 24, रा. रमानगर, सूतगिरणी, ता. श्रीरामपूर), मथूर विजय काळे (वय 21) अशी आरोपींची नावे आहेत.

पुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यावरील सम्राट ढाब्याजवळील तोडमल वस्तीजवळ सुधीर अशोक कांदे (वय 35, रा. गोंधवणी, श्रीरामपूर) या तरुणाचा खून करण्यात आला होता. याबाबत नवनाथ दादासाहेब चौधरी (रा.गोंधवणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला असून, एका सराईत आरोपीसह दोघांना अटक केली.

सुधीर कांदे हे रस्त्याने पायी जात असताना आरोपींनी त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर बसविले व त्यांना लुटण्यासाठी अज्ञातस्थळी नेलेे. आरोपींनी चाकूने भोसकून सुधीर कांदे यांना ठार मारले व मोबाईल घेऊन आरोपी पसार झालेे. एलसीबीचे दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, हवालदार दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, विजय वेटेकर, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, संदीप चव्हाण, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.

किरणवर 13 गुन्हे

किरण सुरेश काकफळे (वय 24, रा.श्रीरामपूर) हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे. पोलिस दफ्तरी त्याच्यावर दरोडा, जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे असे 13 गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा

पावसात भिजून सहानुभूती मिळते पण थोडीच : मंत्री छगन भुजबळ

सांगली जिल्ह्यात ‘आयटी पार्क’ची उभारणी शक्य

सांगली : दत्त इंडियाने दुसरा हप्ता 500 रुपये द्यावा

The post अहमदनगर : आधी लिफ्ट, नंतर चाकूने भोसकले appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow