आकुर्डी, पिंपरीतील पंतप्रधान आवास योजनेला प्रतिसाद
पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी आकुर्डी व उद्यमनगर, पिंपरी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. येथील 938 सदनिकांसाठी सोमवार (दि.10) पर्यंत 9 हजार 128 जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 452 जणांनी 10 हजार 500 रूपये शुल्क भरले आहे. आकुर्डी येथील गृहप्रकल्पात एकूण 568 सदनिका आहेत. तर, उद्यमनगर येथील … The post आकुर्डी, पिंपरीतील पंतप्रधान आवास योजनेला प्रतिसाद appeared first on पुढारी.


पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी आकुर्डी व उद्यमनगर, पिंपरी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. येथील 938 सदनिकांसाठी सोमवार (दि.10) पर्यंत 9 हजार 128 जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 452 जणांनी 10 हजार 500 रूपये शुल्क भरले आहे.
आकुर्डी येथील गृहप्रकल्पात एकूण 568 सदनिका आहेत. तर, उद्यमनगर येथील गृहप्रकल्पात एकूण 370 सदनिका आहेत. हे दोन्ही गृहप्रकल्प तयार आहेत. सदनिकेसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी) व दिव्यांग असे आरक्षण आहे. आकुर्डीतील सदनिकेसाठी 7 लाख 35 हजार 255 रूपये आणि पिंपरीतील सदनिकेसाठी 7 लाख 92 हजार 699 रूपये स्वहिस्सा भरावा लागणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून 28 जूनपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
आतापर्यंत 13 दिवसांत एकूण 9 हजार 128 अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 452 अर्जदारांनी 10 हजार रूपये अनामत रक्कम व 500 रूपये नोंदणी शुल्क ऑनलाइन जमा केले आहे. अर्ज 28 जुलैपर्यंत ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तसेच, अर्जदार व त्यांच्या कुटुंबांच्या नावाने देशात घर नसावे. तो शहराचा रहिवाशी असावा, अशा अटी आहेत.
नागरिकांचा मोठा प्रतिसाद
आकुर्डी व पिंपरी येथील दोन गृहप्रकल्पांसाठी शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ 13 दिवसांत तब्बल 9 हजार 128 जणांनी अर्ज केले आहेत. 28 जुलैच्या मुदतीनंतर पात्र अर्जाची यादी करून त्यातून सोडत काढण्यात येणार आहे, असे झोपडपट्टी निमुर्लन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.
हेही वाचा
नाशिक : देवळालीत बिबट्याचा धुमाकूळ, मध्यरात्री होतोय पाळीव प्राण्यांवर हल्ला
भिगवण : मत्स्यव्यवसाय परीक्षेबाबत शासनाची उदासीनता
भोरच्या दुर्गम भागास शिक्षकांची नापसंती
The post आकुर्डी, पिंपरीतील पंतप्रधान आवास योजनेला प्रतिसाद appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






