आपल्या आराेग्य आणि ‘अ’ जीवनसत्त्व, जाणून घ्या सविस्तर
‘अ’ जीवनसत्त्व ( Vitamin A ) हे प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते. यामुळे आपल्या पेशी अतिसक्रिय होण्यापासून बचावल्या जातात. यामुळे अनेक प्रकारच्या फूड अॅलर्जीचा धोका कमी होतो. ‘अ’ जीवसत्त्व हृदयरोग, मधुमेह, अस्थमा आणि अनेक प्रकारच्या कर्करोगापासूनही बचाव करते. त्वचा आरोग्यसंपन्न आणि चमकदार राहावी, हाडे मजबूत राहावीत, दात स्वास्थ्यपूर्ण राहावेत आणि डोळ्यांची द़ृष्टी कायम सतेज … The post आपल्या आराेग्य आणि ‘अ’ जीवनसत्त्व, जाणून घ्या सविस्तर appeared first on पुढारी.
‘अ’ जीवनसत्त्व ( Vitamin A ) हे प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते. यामुळे आपल्या पेशी अतिसक्रिय होण्यापासून बचावल्या जातात. यामुळे अनेक प्रकारच्या फूड अॅलर्जीचा धोका कमी होतो. ‘अ’ जीवसत्त्व हृदयरोग, मधुमेह, अस्थमा आणि अनेक प्रकारच्या कर्करोगापासूनही बचाव करते.
त्वचा आरोग्यसंपन्न आणि चमकदार राहावी, हाडे मजबूत राहावीत, दात स्वास्थ्यपूर्ण राहावेत आणि डोळ्यांची द़ृष्टी कायम सतेज राहावी या सर्व गोष्टींसाठी आपल्या शरीराला ‘अ’ जीवनसत्त्वाची गरज असते. आपल्या आहारात निरनिराळ्या रूपात हे जीवनसत्त्व पुरेशा रूपात असते. मात्र याची कमतरता असल्यास ती पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक स्रोतांचाही लाभ उठवला पाहिजे. त्यासाठी गोळ्या अथवा औषधे मात्र घेऊ नयेत.
कारण ते नुकसानकारक ठरू शकते. ‘अ’ जीवनसत्त्व हे चरबीमध्ये मिसळणारे आहे. ते प्रामुख्याने रेटीनॉईड आणि कॅरोटीनॉईड या दोन रूपात आढळते. भाज्यांचा रंग जेवढा गडद आणि चमकदार, त्यामध्ये कॅरोटीनॉईडचे प्रमाण तेवढेच जास्त असते. आतापर्यंत जवळपास 600 प्रकारच्या कॅरोटीनॉईड बाबतची माहिती आहे. मात्र, बिटाकॅरोटीन, अल्फाकॅरोटीन आणि बिटा-जॅन्थोफिल सर्वात महत्त्वपूर्ण आहे. त्यांना ‘प्रो-व्हिटॅमिन ए’ असे म्हणतात. विशेष परिस्थितीत शरीर यांना रेटीनॉईडमध्ये परावर्तित करून घेते.
‘अ’ जीवनसत्त्वाची गरज
‘अ’ जीवनसत्त्वाला रेटीनल असेही म्हणतात. कारण हे डोळ्यांच्या रेटीनामध्ये पिग्मेंटस् उत्पन्न करते. ‘अ’ जीवनसत्त्व आपल्या डोळ्यांचे आरोग्य राखण्याचे काम करते आणि कमी प्रकाशात ही वस्तू बघण्यासाठी मदत करते. त्वचा, दात, हाडे, म्युकसमेंब्रेन यासाठी गरजेचे आहेच; पण त्याचबरोबर प्रजनन आणि स्तनपानासाठीही आवश्यक आहे. रेटीनॉईड हे ‘अ’ जीवनसत्त्वाचे सक्रिय रूप आहे. शरीरात प्रोटीनची कमतरता जीवनसत्त्व ‘अ’ च्या रेटीनॉईड स्वरूपाच्या कमतरतेचे कारण बनू शकते.
Vitamin A : प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे
चरबीमध्ये मिसळणारे असल्यामुळे ‘अ’ जीवनसत्तवाच्या शोषणासाठी योग्य प्रमाणात चरबी आणि झिंकचेदेखील शोषण होणे अधिक आवश्यक आहे. ‘अ’ जीवनसत्त्व हे प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते. यामुळे आपल्या पेशी अतिसक्रिय होण्यापासून बचावल्या जातात. यामुळे अनेक प्रकारच्या फूड अॅलर्जीचा धोका कमी होतो. ‘अ’ जीवनसत्त्व हे पेशींच्या सामान्य विकासासाठी आणि कार्यप्रणालीसाठी, प्रजननासाठी, पुरुषांमध्ये योग्य प्रमाणात स्पर्म तयार होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
‘अ’ जीवनसत्त्व हे एक अॅन्टीऑक्सिडंट आहे. अॅन्टीऑक्सिडंट हे पेशींना फ्री रॅडिकल्सच्या हानीकारक प्रभावापासून बचाव करते. अ जीवसत्व हे हृदयरोग, मधुमेह, अस्थमा आणि अनेक प्रकारच्या कर्करोगापासूनही बचाव करते.
काही शारीरिक अवस्थांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाच्या रेटीनॉईड स्वरूपाची गरज असते. खासकरून गर्भावस्था आणि स्तनपानादरम्यान, मुलांच्या विकासासाठी, रातआंधळेपणापासून बचाव करण्यासाठी, लाल रक्तपेशींची निर्मिती करण्यासाठी, संक्रमणापासून सुरक्षितता राखण्यासाठी याची भूमिका महत्त्वाची असते. या समस्या नसल्या तरीही ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कॅरोटीनॉईड रुपाची गरज असते. याचादेखील आरोग्यावर तितकाच परिणाम होत असतो. बहुतेक कॅरोटीनॉईड हे अॅन्टीऑक्सिडंटप्रमाणे काम करते. वेगवेगळे कॅरोटीनॉईड आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करते.
शाकाहारी व्यक्तींना Vitamin A अधिक गरज
शाकाहारी व्यक्तींना ‘अ’ जीवनसत्त्वाची अधिक गरज असते. यकृताचे आजार, सिस्टीक फायब्रोसिस इत्यादीद्वारे पीडित लोकांनाही ‘अ’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सने वेगवेगळ्या वयोगटासाठी त्याची कमाल सीमा निश्चित केली आहे. त्याला अप्पर इनटेक लेव्हल (युईएल) असे म्हटले आहे. 0 ते 6 महिने 400 मायक्रोग्रॅम, 6 ते 12 महिने 500 मायक्रोग्रॅम, 4 ते 8 वर्षे 700 मायक्रोग्रॅम, 9 ते 14 वर्षे 1700 मायक्रोग्रॅ्रम, 14 ते 18 वर्षे 2800 मायक्रोग्रॅम, 19 ते 70 वर्षे 3000 मायक्रोग्रॅम, गर्भवती महिलांसाठी 2800 ते 3000 मायक्रोग्रॅम. या प्रमाणात वयानुसार ‘अ’ जीवनसत्वाची गरज असते.
कशात मिळते ‘अ’ जीवनसत्व ?
‘अ’ जीवनसत्वाचे नैसर्गिक स्रोत म्हणजे हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे, पत्ताकोबी, गाजर, पालक, रताळे, दही, मोड आलेले कडधान्य इत्यादी होत. त्याचबरोबर अंडी, मांस, दूध, पनीर, क्रिम, मासे यामध्येही ‘अ’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आढळते; परंतु यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रेरॉलदेखील अधिक प्रमाणात आढळते.
हेही वाचा :
- कौतुकास्पद !! वडापाव विक्रेत्याची मुलगी झाली पीएसआय
- नगर : रस्त्यांच्या कामासाठी 6 कोटी मंजूर : ना. विखे
- नाशिक : पेठरोडसह दिंडोरी रोडवरील कचऱ्याचे ढीग हटवले | दैनिक पुढारी इम्पॅक्ट
The post आपल्या आराेग्य आणि ‘अ’ जीवनसत्त्व, जाणून घ्या सविस्तर appeared first on पुढारी.
What's Your Reaction?