इंग्लंडपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था भक्कम : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
कोल्हार (नगर ): पुढारी वृत्तसेवा: ‘सबका साथ सबका विकास, सबका विश्वास’ हे ध्येय ठेवून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात विविध योजना व उपक्रमांना नवे संदर्भ देऊन गरीब जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. शेतकर्यांसाठी एक रुपयात विमा योजना देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. इंग्लंडपेक्षा भारताची अर्थव्यवस्था आज सक्षम असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत पाचव्या … The post इंग्लंडपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था भक्कम : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील appeared first on पुढारी.
कोल्हार (नगर ): पुढारी वृत्तसेवा: ‘सबका साथ सबका विकास, सबका विश्वास’ हे ध्येय ठेवून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात विविध योजना व उपक्रमांना नवे संदर्भ देऊन गरीब जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. शेतकर्यांसाठी एक रुपयात विमा योजना देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. इंग्लंडपेक्षा भारताची अर्थव्यवस्था आज सक्षम असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. कितीही आघाड्या आल्या तरी भारताच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा वेग कोणीही थांबू शकणार नाही, असे विश्वास पूर्ण प्रतिपादन महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
कोल्हार येथील ग्रामदैवत भगवती माता मंदिराच्या सभा मंडपात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे पाटील हे होते. यावेळी तहसीलदार अमोल मोरे, प्रांताधिकारी माणिक आहेर, बीडीओ पठारे, जल जीवन मिशनचे बी. डी. कांबळे, वरपे, महावितरणचे अधिकारी राजेंद्र गाडे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे जाधव, सर्कल बाळासाहेब कोळगे, अॅड. सुरेंद्र खर्डे, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, देवालय ट्रस्टचे विश्वस्त संभाजीराजे देवकर, कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सरपंच निवेदिता बोरुडे, उपसरपंच सविता गोरक्ष खर्डे, स्वप्निल निबे, धनंजय दळे, ग्रामविकास अधिकारी श्रीराम कोते, कोल्हार बुद्रुक च्या तलाठी सुरेखा अबूज, गोरक्ष खर्डे कोल्हार भगवतीपूर देवालयट्रस्टचे सचिव संपत कापसे, देवालय ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांच्यासह कोल्हार भगवतीपुरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रकच्यावतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हार भगवतीपुर ग्रामस्थांशी संवाद साधत उपस्थित विविध खात्यातील अधिकार्यांना सूचना करून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या.
तिसर्या आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नाही
देशामध्ये आज मोदीजींच्या विरोधात तिसर्या आघाडीचा होत असलेला प्रयोग कधीही यशस्वी होणार नाही. आघाड्यांचे प्रयोग कसे असतात, हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. त्यामुळे 2024 साली पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील नऊ वर्षात केवळ लोकहित आणि देशहिताचे निर्णय झाले. या निर्णयातून देश आज आत्मनिर्भर झाला आहे. जगात पाचव्या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून देशाची प्रतिमा उंचावली आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा मार्ग मोदी यांनी सर्वांना दाखवून दिल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केले.
हे ही वाचा :
सातारा : माजी उपसभापती बोराटेंच्या मुलाच्या खुनाचा डाव उधळला
अब्दुल सत्तार कृषी खाते सोडणार
The post इंग्लंडपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था भक्कम : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील appeared first on पुढारी.
What's Your Reaction?