कात्रज परिसरात वाहनांची तोडफोड ; पाच जणांना अटक
पुणे/धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : शहरात वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कात्रज भागात पूर्वीच्या वादातून दोन गटांत झालेल्या वादात एका सोसायटीच्या परिसरात लावण्यात आलेल्या सहा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मधुकर ऊर्फ आप्पा ग्यानबा भिलारे (वय 47), आकाश नानासाहेब गरबडे … The post कात्रज परिसरात वाहनांची तोडफोड ; पाच जणांना अटक appeared first on पुढारी.


पुणे/धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : शहरात वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कात्रज भागात पूर्वीच्या वादातून दोन गटांत झालेल्या वादात एका सोसायटीच्या परिसरात लावण्यात आलेल्या सहा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मधुकर ऊर्फ आप्पा ग्यानबा भिलारे (वय 47), आकाश नानासाहेब गरबडे (वय 27), अमित उत्तम भिलारे (वय 36), फिरोज हसन शेख (वय 24), मुस्तफा मेहबूब शेख (वय 21, सर्व रा. भिलारेवाडी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भीमाजी सावंत (वय 33, रा. ओमसाई निवास, भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी (दि. 15) रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत यांचा आरोपींशी वाद झाला होता. आरोपी भिलारे, गरबडे, शेख आणि साथीदार ओम साई निवास सोसायटीच्या परिसरात आले. त्यांनी शिवीगाळ केली. सोसायटीच्या आवारात लावण्यात आलेल्या दोन मोटारी, रिक्षा, दुचाकी तसेच टँकरवर दगडफेक केली. कोयते आणि बेसबॉल स्टिक उगारून दहशत माजविली.
पार्किंगमधील वाहनांच्या काचा फोडल्या
आकाश गरबडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि आविष्कार भिलारे, फिरोज शेख यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ वादवादीच्या कारणातून आरोपींनी आप्पासाहेब भिलारे यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये फिर्यादी व आविष्कार भिलारे असे गप्पा मारत थांबले असताना आरोपी तेथे आले. त्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधील मोपेड व इतर दुचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोडफोडीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
हे ही वाचा :
नाशिक : शेततळ्यात बुडून विद्यार्थाचा मृत्यू, मृतदेह रस्त्यावर ठेवत नातेवाइकांचा ठिय्या
खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा चिंता वाढविणारा
The post कात्रज परिसरात वाहनांची तोडफोड ; पाच जणांना अटक appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






