किरीट भाई हसन मुश्रीफ यांना जेलमध्ये पाठवण्याचे काय झाले? काँग्रेस प्रवक्ते राजहंस
राज्यातील राजकारणात मागील वर्षभरात मोठ्या घडामोडी होत असताना या घडामोडीत सर्वात मोठी नामुष्की मात्र भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांच्यावर २ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत मुश्रीम लवकरच जेलमध्ये जाणार असा दावा सोमय्यांनी केला होता पण मुश्रीम जेलमध्ये न जाता भाजपा सरकारमध्ये मंत्री झाले. या घटनेनंतर सोमस्यांवर तोफ डागत काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी किरिटभाई, मुश्रीम जेलमध्ये कधी जणार? असा सवाल विचारला आहे.
किरीट सोमय्या मागील तीन चार वर्षांपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून देत आहेत. आधी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेना आमदार यामिनी जाधव, खासदार भावना गवळी यांच्यावरही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यातील काही नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआयच्या चौकशीचा फेरा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीम यांच्यावरही दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. बॅग भरुन तयार आहे आता मुश्रीम लवकरच जेलमध्ये जाणार, हे सोमय्या मोठ्या फुशारकीने सांगत असत. हसन मुश्रीफही जेलवारी टाळण्यासाठी कोर्टाच्या चकरा मारत होते पण अचानक राजकीय चक्रं फिरली आणि अजित पवार व सहकारी भाजपा सरकारमध्येच सहभागी झाले व त्यात हसन मुश्रीफांना मंत्रीपदही मिळाले.
किरिट सोमय्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत असतात ते काही दिवसांनी भाजपात सन्मानाने जातात आणि सोमय्या यांची मात्र गोची होते. आताही तेच झाले असून सर्वसामान्य लोक सोमय्यांच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाईची टिंगळ करु लागले आहेत. सोमय्या ज्यांच्यावर आरोप करतात त्यांचे राजकीय भविष्य उजळते, राजकीय लाभ होतो असा संदेश समाजात गेला आहे. या सर्व राजकीय साठमारीत किरिट सोमय्या यांची अवस्था मात्र ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे, असेही राजहंस म्हणाले.
What's Your Reaction?