कुकाणा : नाफेडचे कांदा खरेदी केंद्र अचानक बंद

कुकाणा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील देवगड फाट्यावर हरिशक्ती एपीओ व वृत्ताशक्तीमार्फत नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आज (दि.11) नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर देवगड फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. या संदर्भात नेवाशाचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक व नाफेडच्या व्यवस्थापकांना शेतकरी संघटनेने निवेदन … The post कुकाणा : नाफेडचे कांदा खरेदी केंद्र अचानक बंद appeared first on पुढारी.

कुकाणा : नाफेडचे कांदा खरेदी केंद्र अचानक बंद

कुकाणा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील देवगड फाट्यावर हरिशक्ती एपीओ व वृत्ताशक्तीमार्फत नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आज (दि.11) नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर देवगड फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. या संदर्भात नेवाशाचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक व नाफेडच्या व्यवस्थापकांना शेतकरी संघटनेने निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, देवगड फाटा येथे सुरू झालेले नाफेड कांदा खरेदी केंद्र काल अचानक बंद केले. त्यामुळे सात ते आठ दिवसांपासून या केंद्रावर कांद्याने भरलेले 70 ते 80 ट्रॅक्टर उभे आहेत.

परंतु, अचानक केंद्र बंद केल्याने कांदा विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचे करायचं काय? अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. या निर्णयाने कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. ट्रॅक्टरमधील कांदा खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा देणे गरजेचा असताना, त्याबाबत कांदा खरेदी बाबत निर्णय होत नसल्याचे दिसत आहे. रांगेत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील कांदा खरेदी करावा, यासाठी मंगळवारी (दि.11) सकाळी अकरा वाजता देवगड फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर शरद जोशी विचारमंच शेतकरी

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार, प्रदेश कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष अंबादास कोरडे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, युवक तालुकाध्यक्ष दादा नाबदे, जगन्नाथ कोरडे, मेजर सुभाष वाळुंज, सतीश कोतकर, जगन्नाथ कोरडे, दौलत गणगे, दिलीप पोटे, प्रताप चांदणे आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा

निघोज : मळगंगा माता एक जागृत देवस्थान : अपर राज्यकर आयुक्त सुभाष एंगडे

चिचोंडी पाटील : शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांना जाग

पाथर्डी तालुका : घरगुती ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले

The post कुकाणा : नाफेडचे कांदा खरेदी केंद्र अचानक बंद appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow